शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

तालिबानमध्ये सत्तासंघर्ष... सरकारमध्ये फूट...; हक्कानी नेटवर्कच्या नेत्याशी बरादरचा वाद; काबूल सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2021 15:22 IST

दोहा येथे अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेवेळी अब्दुल गनी हा  प्रमुख होता. यामुळे, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य जाण्याचे क्रेडीट त्याचाच गड घेतो. मात्र, हक्कानी गट हा तालिबानमधील सर्वात टेरर गट असल्याचे मानले जाते. या गटाचे पाकिस्तानी सैन्यासोबत जवळचे संबंध आहेत.

अफगाणिस्तानमध्येतालिबानचे सरकार स्थापन होताच परस्पर संघर्षही सुरू झाला आहे. तालिबान सरकारमध्ये उपपंतप्रधान म्हणून नियुक्त झालेला मुल्ला अब्दुल गनी बरदरने हक्कानी नेटवर्कच्या एका वरिष्ठ नेत्याशी वाद झाल्यानंतर काबूल सोडल्याचे वृत्त आहे. सत्ता वाटपावरून बरादार आणि खलील-उर-रहमान हक्कानी यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. (Afghanistan Fight in taliban abdul ghani baradar left kabul after fight with haqqani network leader)

एका वरिष्ठ तालिबानी नेत्याच्या हवाल्याने बीबीसीने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, गेल्या आठवड्यात दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रपती कार्यालयात अंतरिम मंत्रिमंडळावरून वाद झाला होता. तसेच, 15 ऑगस्ट रोजी तालिबान्यांनी काबूलवर कब्जा केला. तेव्हापासूनच नेतृत्व आणि सरकार स्थापनेवरून वेगवेगळ्या गटांमध्ये संघर्ष सुरू आहेत.

तालिबानच्या राजकीय शाखेच्या वतीने सरकारमध्ये हक्कानी नेटवर्कला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. हक्कानी नेटवर्क स्वतःला तालिबानची सर्वात लढाऊ युनिट म्हणवतो. तर बरादरच्या गटाचे म्हणणे आहे, की त्यांच्या मुत्सद्दीपणामुळेच तालिबानला अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळाली आहे. याच बरोबर, हक्कानी नेटवर्कमधील लोकांना वाटते, की अफगाणिस्तानमध्ये विजय लढाईच्या बळावरच मिळाला आहे. 

तालिबानी राज्यात काबूल विद्यापीठातील पहिला क्लास; तरुणींना बुरख्यात बोलावून दिली शरिया कायद्याची शपथ

तत्पूर्वी, दोहा येथे अमेरिका आणि तालिबान यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेवेळी अब्दुल गनी हा  प्रमुख होते. यामुळे, अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य जाण्याचे क्रेडीट त्याचाच गड घेतो. मात्र, हक्कानी गट हा तालिबानमधील सर्वात टेरर गट असल्याचे मानले जाते. या गटाचे पाकिस्तानी सैन्यासोबत जवळचे संबंध आहेत.

कंदहार आणि इतर भागांतील तालिबान्यांत सत्त संघर्ष -तालिबानमध्ये विविध स्थरांवर वाद निर्माण झाले आहेत. कंदहार प्रांतातून आलेले तालिबान नेते आणि उत्तर आणि पूर्व अफगाणिस्तानमधील नेत्यांमध्येही मतभेद आहेत. कंदहार हा तालिबानचा गड मानला जातो. अशा स्थितीत तेथील नेत्यांना सत्तेत महत्त्वाचा सहभाग हवा आहे. गेल्या काही दिवसांपासून बरादार सार्वजनिक ठिकाणी दिसला नाही. यामुळे गोळीबारात तो जखमी किंवा मरण पावल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. मात्र, सोमवारी एक ऑडिओ रिलिज करून आपण सुरक्षित असून प्रवासात असल्याचे बरादरने म्हटले आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानTerrorismदहशतवादterroristदहशतवादी