अफगाणिस्तानमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप; हादऱ्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 03:21 PM2023-12-12T15:21:57+5:302023-12-12T15:22:22+5:30

अफगाणिस्तानमध्ये आज सकाळी ७.३५ च्या सुमारास भूकंपाचे तीव्र झटके जाणवले

Afghanistan earthquake: Powerful tremors of 5.2 magnitude hit Taliban ruled country | अफगाणिस्तानमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप; हादऱ्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

अफगाणिस्तानमध्ये 5.2 रिश्टर स्केलचा जोरदार भूकंप; हादऱ्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानभूकंपाने हादरला आहे. अफगाणिस्तानात आज सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.2 इतकी मोजली गेली. भूकंपाची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) दिली. मंगळवारी सकाळी ७.३५ वाजता भूकंप झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सध्या कोणत्याही प्रकारची हानी झाल्याची माहिती नाही.

अलीकडच्या काळात अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के अनेकदा जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या भूकंपाने देशात हाहाकार माजला होता. पश्चिम भागात झालेल्या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक गंभीर जखमी झाले.

भूकंपामुळे हजारो घरे जमीनदोस्त झाली आणि लोक बेघर झाले. त्यांना अन्न किंवा निवारा या मूलभूत सुविधा मिळाल्या नव्हत्या. लोकांना बराच काळ उघड्यावर राहावे लागले. अशा परिस्थितीत अनेक देशांनी अफगाणिस्तानला आर्थिक मदत केली होती. तशातच आता आणखी एक भूकंपाचा धक्का बसल्याने यातून अफगाणिस्तानला किती हानी झाली आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Afghanistan earthquake: Powerful tremors of 5.2 magnitude hit Taliban ruled country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.