Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात एक कोटीहून अधिक लोकांवर उपासमारीची वेळ? तालिबानींचा संघर्ष, दुष्काळ, कोरोनामुळे स्थिती आणखी बिकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 05:49 IST2021-08-20T05:49:29+5:302021-08-20T05:49:55+5:30
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानातील नागरिकांना अन्नधान्याचा पुरेसा साठा पोहोचविण्याचे संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी २० कोटी डॉलर इतका खर्च होणार आहे.

Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात एक कोटीहून अधिक लोकांवर उपासमारीची वेळ? तालिबानींचा संघर्ष, दुष्काळ, कोरोनामुळे स्थिती आणखी बिकट
संयुक्त राष्ट्रे : अफगाणिस्तानवरतालिबानींनी कब्जा केल्यामुळे तिथे एक भयानक संकट उभे राहाणार आहे. त्या देशातील लोकसंख्येपैकी १.४ कोटी जणांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, अशी भीती संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रम या संघटनेने व्यक्त केली आहे.
या संघटनेने सांगितले की, अफगाणिस्तानात सुरू असलेला संघर्ष, गेली तीन वर्षे तिथे पडलेला दुष्काळ व कोरोनाची साथ या गोष्टींमुळे तेथील अवस्था खूप बिकट झाली आहे. त्या देशातील ४० टक्के पिके नष्ट झाली आहेत. अपुऱ्या चारापाण्यामुळे असंख्य गुरेढोरे मरण पावली. हजारो लोक विस्थापित झाले. काही महिन्यांनी हिवाळा सुरू होईल. अफगाणिस्तानातील नागरिकांना अन्नधान्याचा पुरेसा साठा पोहोचविण्याचे संयुक्त राष्ट्रांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी २० कोटी डॉलर इतका खर्च होणार आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकी सैन्य ३१ ऑगस्टनंतरही थांबण्याची शक्यता
सर्व अमेरिकी नागरिकांना मायदेशी परत नेईपर्यंत आमचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये थांबणार आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी जाहीर केले आहे. सर्व अमेरिकी सैन्य ३१ ऑगस्टपूर्वी माघारी परतणार होते. मात्र आता त्यानंतरही काही काळ अमेरिकी सैनिक अफगाणिस्तानमध्ये थांबण्याची शक्यता आहे.