शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

महिला हक्क कार्यकर्ती फ्रेश्ता यांची हत्या, भाऊ गंभीर जखमी; दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचा कयास 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 6:16 AM

Afghan woman activist Freshta Kohistani gunned down in Kapisa province : ही हत्या दहशतवाद्यांनी केली असावी, असा अफगाण पोलिसांचा कयास आहे.

काबूल : अफगाणिस्तानातील महिला हक्क कार्यकर्ती फ्रेश्ता कोहिस्तानी यांची कपिसा प्रांतातील हेस-ए-अवल भागामध्ये गुरुवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात फ्रेश्ता यांचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. ही हत्या दहशतवाद्यांनी केली असावी, असा अफगाण पोलिसांचा कयास आहे. फ्रेश्ता कोहिस्तानींच्या हत्येची जबाबदारी अद्याप एकाही दहशतवादी गटाने स्वीकारलेली नाही. फ्रेश्ता कोहिस्तानी या प्रांतिक कौन्सिलच्या माजी सदस्य होत्या. अफगाणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात फ्रेश्ता यांनी अफगाणिस्तानमध्ये निदर्शने केली होती. गझनी येथील पत्रकार संघटनेचे अध्यक्ष रहमतुल्ला निकजाद यांची मंगळवारी हत्या करण्यात आली. 

शांततेच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचा कट अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तेथील सरकार व तालिबानमध्ये कतार येथे सप्टेंबर महिन्यात चर्चा सुरू झाली. त्यात काही प्रमाणात प्रगतीही झाली. मग ही चर्चा पुढील महिन्यात जानेवारीपर्यंत स्थगित करण्यात आली. ही चर्चा पुन्हा सुरू होण्यास आणखी काही विलंब लागेल. शांततेच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याकरिता हत्या करण्यात येत असाव्यात.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानMurderखून