अदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 09:10 AM2021-05-16T09:10:14+5:302021-05-16T09:11:23+5:30

Dr. Cyrus Poonawalla : काही दिवसांपूर्वी अदर पूनावाला गेले होते लंडनमध्ये. त्यानंतर त्यांचे वडील सायरस पूनावाला हेदेखील लंडनमध्ये गेल्यानं त्यांनी देश सोडल्याच्या रंगल्या होत्या चर्चा.

adar father cyrus poonawalla also went to london know what he said on leaving country | अदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...

अदर पूनावालांचे वडील सायरस पूनावालाही लंडनमध्ये; पाहा देश सोडण्याच्या चर्चांवर काय म्हणाले...

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी अदर पूनावाला गेले होते लंडनमध्ये.त्यानंतर त्यांचे वडील सायरस पूनावाला हेदेखील लंडनमध्ये गेल्यानं त्यांनी देश सोडल्याच्या रंगल्या होत्या चर्चा.

काही दिवसापूर्वी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला हे लंडनमध्ये गेल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि अदर पूनावाला याचे वडील सायरस पूनावाला हेदेखील लंडनला गेल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, त्यानंतर त्यांनी देश सोडल्याच्या चर्चा काही ठिकाणी सुरू होत्या. परंतु त्यांनी या चर्चांना फेटाळत यावर पूर्णविराम लावला आहे. लंडमध्ये द संडे एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. तसंच आपण गरमीच्या सुट्टीसाठी लंडनमध्ये आल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच दरवर्षी आपण असं करतो. संकटाच्या काळात आपल्यावर किंवा आपल्या मुलावर असे आरोप करणं खोटं आणि दुर्देवी असल्याचंही सायरस पूनावाला म्हणाले. 

"जेव्हापासून मला आठवणीत आहे तेव्हापासून मी मे महिना हा भारताच्या बाहेरच घालवला आहे. प्रत्येकाला गरमीची सुट्टी हवी असते. यावेळीही ती कोणती नवी गोष्ट नाही," असं सायरस पूनावाला म्हणाले. सायरस पूनावाला यांचे पुत्र अदर पूनावाला हे गेल्या महिन्याभरापासून लंडनमध्ये आहेत. या ठिकाणी त्यांनी दिेलेल्या एका मुलाखतीत आपल्याला शक्तिशाली लोकांकडून धमकी मिळाल्याचं म्हटलं होतं. तसंच कोविशिल्ड लसीच्या पुरवठ्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्याचे प्रयत्न करण्यात येत होतं असंही त्यांनी म्हटलं होतं. 

सध्या सीरम इन्स्टिट्यूट भारतात कोविशिल्ड या लसीचं उत्पादन करत आहे. यापूर्वी ३ मे रोजी आपल्या वक्तव्यात अदर पूनावाला यांनी एका रात्रीत लसीचं उत्पादन वाढवणं, त्यात तेजी आणणं शक्य नसल्याचं म्हटलं होतं. तसंच क्षमता वाढवण्यासाठी आपली कंपनी शक्य ते प्रयत्न करत आहे आणि ध्येय गाठण्यासाठी अधिकाधिक मेहनत केली जाईल असंही अदर पूनावाला म्हणाले होते. 

आपला लंडनमधील मुक्काम हा तात्पुरता आणि लवकरच आपण भारतात परतण्याच्या विचारात असल्याचं पूनावाला यांनी १ मे रोजी ट्विटरद्वारे सांगितलं होतं. सध्या त्यांचे वडिलही लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये जाणं ही आली नियमित बाब आहे. "अदर पूनावाला जेव्हा लहान होते तेव्हापासून त्यांना घेऊन आपण लंडनला येत होतो. आता त्यांची मुलं लंडनमध्ये शिक्षण घेत आहेत. हा एक नियमित प्रवास आहे. खरं पाहिलं तर आम्ही दरवर्षी डर्बीत जातो," असंही ते म्हणाले. 

नव्या योजनांवर विचार

कंपनी युरोपमध्ये नव्या योजनांवर विचार करत आहे. कोरोनाच्या लसींचं उत्पादन भारतात सुरू आहे. आम्ही युरोपमध्ये काही कंपन्यांसोबत चर्चा करत आहोत. याबद्दल आत्ताच काही सांगणं घाईचं ठरणार असल्याचंही पूनावाला म्हणाले.

Web Title: adar father cyrus poonawalla also went to london know what he said on leaving country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.