...म्हणून किम जोंग उन आहेत गायब; दक्षिण कोरियातील माध्यामांच्या दाव्यानंतर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 08:59 AM2020-04-28T08:59:27+5:302020-04-28T09:04:25+5:30

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उलट सूलट चर्चा सुरु आहे.

According to South Korean media, North Korean President Kim Jong Un's bodyguard was infected with a corona mac | ...म्हणून किम जोंग उन आहेत गायब; दक्षिण कोरियातील माध्यामांच्या दाव्यानंतर खळबळ

...म्हणून किम जोंग उन आहेत गायब; दक्षिण कोरियातील माध्यामांच्या दाव्यानंतर खळबळ

googlenewsNext

उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांच्यावर कार्डियोवेस्क्युलेरची शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती ढासळली असल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. तसेच किम जोंग उन कोमात गेले असल्याचा दावा ब्रिटनच्या Dailymail या वृत्तपत्राने केला होता. त्याचप्रमाणे किम जोंग उन यांच्या मृत्यू झाला असल्याचा दावा देखील आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता. मात्र किम जोंग उन यांची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत दक्षिण कोरियाने या वृत्ताचे पुन्हा एकदा खंडन केले आहे. दक्षिण कोरियाने प्रकृतीच्या वृत्तांचे खंडन केले असले तरी किम जोंग उन लोकांसमोर का येत नाही असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच आता दक्षिण कोरियातील माध्यमांनी पुन्हा एकदा नवा खुलासा केला आहे.

दक्षिण कोरियातील जुन्गअंब लबोनं या वृत्तपत्रामध्ये किम जोंग उन यांच्या सुरक्षारक्षकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे ते बाहेर येत नाही, असा दावा केला आहे. तसेच डॉनंग- ए- लंबोनं या वृत्तपत्रानं देखील किम जोंग उन यांच्या काही अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे किम जोंग उन यांनी उत्तर कोरियामध्ये 'रिसॉर्ट' परिसरात थांबण्याचा निर्णय घेतला, असं सांगण्यात आले आहे. दक्षिण कोरियातील माध्यमांच्या दाव्यानंतर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. मात्र किम जोंग उन यांच्या अचानक गायब होण्यामागे नक्की काय कारण आहे, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे.

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांचे सुरक्षाविषयक एक वरिष्ठ सल्लागारांनी किम जोंग उन जिवंत आहेत, असा खुलासा केला आहे. तसेच किम जोंग उन यांची प्रकृती देखील स्थिर असल्याचा दावा मून जे-इन यांच्या वरिष्ठ सल्लागारांनी केला आहे. 

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उलट सूलट चर्चा सुरु आहे. मात्र त्यातच आता किम जोंग उन यांच्या मालकीची असलेली खास ट्रेन उत्तर कोरियामध्ये 'रिसॉर्ट' परिसरात असल्याचे सांगण्यात येत होते. वॉशिंग्टनमधील उत्तर कोरियाच्या मॉनिटरींग प्रकल्पाद्वारे सॅटेलाइटच्या फोटोनूसार, किम जोंग उन यांची ट्रेन उत्तर कोरियामधील रिसॉर्ट परिसरात उभी असल्याचे दिसून आले होते. यावर किम जोंग उन 13 एप्रिलपासून देशाच्या पूर्वेकडील रिसॉर्ट शहर असलेल्या वॉनसन येथे राहात असल्याचे देखील दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या वरिष्ठ सल्लागारांनी सांगितले आहे.

Web Title: According to South Korean media, North Korean President Kim Jong Un's bodyguard was infected with a corona mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.