२० वर्ष अमेरिकेशी लढत राहिला इराणपेक्षा छोटा देश; लाखो लोक मेले तरीही हार मानली नाही, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 17:00 IST2026-04-02T16:59:43+5:302026-04-02T17:00:20+5:30

दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर जपानी सैन्य १९४५ मध्ये व्हिएतनाममधून मागे हटले आणि मित्र राष्ट्रांच्या दबावाखाली त्यांनी फ्रान्स-समर्थक सम्राट बाओ दाई यांच्याकडे सत्ता सोपवली

A Vietnam country smaller than Iran fought America for 20 years; Even though millions died, it didn't give up | २० वर्ष अमेरिकेशी लढत राहिला इराणपेक्षा छोटा देश; लाखो लोक मेले तरीही हार मानली नाही, अखेर...

२० वर्ष अमेरिकेशी लढत राहिला इराणपेक्षा छोटा देश; लाखो लोक मेले तरीही हार मानली नाही, अखेर...

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्धाबाबत २० मिनिटाच्या भाषणात ऐतिहासिक व्हिएतनाम युद्धाचाही उल्लेख केला. आज जवळजवळ पाच दशकांनंतर व्हिएतनाम अमेरिकेसोबत २० वर्ष युद्ध लढले हे ट्रम्प यांनी कबूल केले. व्हिएतनाम युद्ध हे अमेरिकेचे सर्वात क्रूर, घृणास्पद आणि हिंसक युद्ध मानले जाते. २ दशके चाललेल्या युद्धात ५८ हजाराहून अधिक अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला. ११ लाख उत्तरी व्हिएतनाम आणि २ लाख दक्षिणी व्हिएतनाम सैनिक मारले गेले. या युद्धात दोन्ही बाजूचे २० लाखाहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांनी उल्लेख केलेल्या व्हिएतनाम युद्धात अमेरिकेची एन्ट्री कशी झाली हे समजणे गरजेचे आहे. अमेरिकेचा अनेक दशके या प्रदेशात संघर्ष आहे. व्हिएतनाम पूर्वी फ्रेंच वसाहत होती, जी फ्रेंच इंडोचायना म्हणून ओळखली जात होती. व्हिएतनामी राष्ट्रवादी हो चि मिन्ह यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक चळवळ सुरू केली. त्याच काळात १९४० मध्ये नाझी जर्मनीने फ्रान्सवर ताबा मिळवला. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनीचा मित्रराष्ट्र असलेल्या जपानने इंडोचायनावर हल्ला केला, ज्यामुळे व्हिएतनामवर जपानचे आक्रमण झाले. १९४१ मध्ये हो चि मिन्ह आणि त्यांच्या साम्यवादी सहकाऱ्यांनी 'व्हिएत मिन्ह लीग फॉर व्हिएतनामी इंडिपेंडन्स'ची स्थापना केली आणि जपानी व फ्रेंच आक्रमणापासून स्वातंत्र्यासाठी लढा देण्यास सुरुवात केली. 

दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जेव्हा दोन्ही पक्षांचे पारडे जड झाले तेव्हा व्हिएतनाममधील त्यांचा प्रभाव वाढत गेला. कधी जपानी तर कधी फ्रेंच राजवटीविरुद्ध संघर्ष लढला गेला. दुसऱ्या महायुद्धात पराभव झाल्यानंतर जपानी सैन्य १९४५ मध्ये व्हिएतनाममधून मागे हटले आणि मित्र राष्ट्रांच्या दबावाखाली त्यांनी फ्रान्स-समर्थक सम्राट बाओ दाई यांच्याकडे सत्ता सोपवली. त्यानंतर हो चि मिन्हच्या व्हिएत मिन्ह सैन्याने तात्काळ बंड केले, उत्तरेकडील हनोई शहर ताब्यात घेतले आणि हो यांना अध्यक्ष बनवून साम्यवादी लोकशाही व्हिएतनाम प्रजासत्ताकाची घोषणा केली. हा हिस्सा उत्तर व्हिएतनाम होता. ज्याला चीन आमि सोवियत रशियाकडून पाठिंबा मिळाला. दुसरीकडे फ्रान्सने सम्राट बाओ दाई यांच्या पाठिंब्याने जुलै १९४९ मध्ये सायगॉनला राजधानी बनवून दक्षिण व्हिएतनाम राज्याची स्थापना केली. मे १९५४ साली दोन्ही व्हिएतनाममध्ये संघर्ष झाला. जुलैमध्ये या दोघांमध्ये समझौता करण्यात आला. त्यात दोन्ही व्हिएतनाम एकत्रित करण्याबाबत २ वर्षात निवडणूक घेण्याचे ठरले. मात्र त्याआधीच अमेरिकेने खेळ बिघडवला. 

संयुक्त राज्य अमेरिकेने सोवियत संघाच्या कुठल्याही सहकारी देशांविरोधात कठोर भूमिका घेण्याचे ठरले. त्यात १९५५ मध्ये राष्ट्रपती ड्वाइट डी आइजनहावर यांनी दक्षिण व्हिएतनामला पाठिंबा देत उत्तर व्हिएतनाममध्ये सैन्य कारवाई करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी जुलै १९५९ साली दक्षिण व्हिएतनाममधील अमेरिकन सैनिकांना मारण्यात आले. त्यानंतर अमेरिकेने सीक्रेट ऑपरेशन सुरू केले. १९६२ पर्यंत सुरू युद्धात दक्षिण व्हिएतनाममध्ये अमेरिकन सैनिकांची संख्या ९ हजारांपर्यत पोहचली होती. ऑगस्ट १९६४ मध्ये टेहळणी मोहिमेवर असताना युएसएस मॅडॉक्सवर टॉनकिनच्या आखातात उत्तर व्हिएतनामी गस्ती टॉर्पेडो बोटींनी हल्ला केला. आखातात मॅडॉक्स आणि एक अन्य अमेरिकन जहाजांवर दुसऱ्यांदा हल्ला झाला होता. युद्धातील अमेरिकेची सर्वाधिक जीवितहानी ११ ते १७ फेब्रुवारी १९६८ दरम्यान झाली ज्यात ५४३ अमेरिकन सैनिक ठार झाले. २७ जानेवारी १९७३ रोजी राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी पॅरिस शांतता करारावर स्वाक्षरी करून व्हिएतनाम युद्धातील अमेरिकेचा थेट सहभाग संपुष्टात आणला. अमेरिकन सैन्य व्हिएतनाममधून माघार घेत असताना उत्तर व्हिएतनामचे लष्करी अधिकारी दक्षिण व्हिएतनाम ताब्यात घेण्याचा कट रचत राहिले. त्यानंतर एप्रिल १९७५ साली कम्युनिस्ट सैन्याने दक्षिण व्हिएतनामची राजधानी ताब्यात घेतली आणि तिथल्या सरकारने आत्मसमर्पण केले. 

Web Title : वियतनाम युद्ध: छोटे देश का अमेरिका के खिलाफ 20 साल का संघर्ष।

Web Summary : ट्रम्प ने वियतनाम को याद किया, एक क्रूर युद्ध जहाँ अमेरिकी सेना सोवियत संघ और चीन द्वारा समर्थित कम्युनिस्ट उत्तर के खिलाफ दक्षिण वियतनाम का समर्थन करते हुए एक लंबे संघर्ष में प्रवेश कर गई। वर्षों की लड़ाई और भारी नुकसान के बाद, अमेरिका पीछे हट गया, और उत्तरी वियतनाम ने 1975 में दक्षिण पर कब्जा कर लिया।

Web Title : Vietnam War: Small country's 20-year fight against America.

Web Summary : Trump recalled Vietnam, a brutal war where US forces entered a long conflict supporting South Vietnam against the communist North, backed by USSR and China. After years of fighting and heavy losses, America withdrew, and North Vietnam seized the South in 1975.