धक्कादायक! प्रवाशांनी भरलेल्या विमानाला अचानक लागली आग, नेपाळमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 15:21 IST2025-01-06T15:20:07+5:302025-01-06T15:21:18+5:30

नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन विमानतळावर एका विमानाचे इमर्जन्सी लॅडिंग करण्यात आले.

A plane full of passengers suddenly caught fire, emergency landing in Nepal | धक्कादायक! प्रवाशांनी भरलेल्या विमानाला अचानक लागली आग, नेपाळमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग

धक्कादायक! प्रवाशांनी भरलेल्या विमानाला अचानक लागली आग, नेपाळमध्ये इमर्जन्सी लॅंडिंग

नेपाळमधील काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एका विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. विमानाचे VOR लँडिंग झाल्याचे विमानतळ प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. हे बुद्ध एअरचे फ्लाइट आहे, यामध्ये क्रू मेंबर्ससह ७६ प्रवासी होते. विमानाच्या डाव्या इंजिनला आग लागल्याने लँडिंग करण्यात आले. या अपघातात कोणी जखमी झाल्याची माहिती नाही. विमानाचे सुखरूप लॅडिंग झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. 

काझीरंगामध्ये सफारीदरम्यान जीपमधून खाली पडल्या मायलेकी, समोर उभे होते गेंडे, त्यानंतर...

या घटनेबाबत विमान कंपनीनेही निवेदन प्रसिद्ध केले आहे. विमानातील सर्व लोक सुरक्षित असल्याची माहिती दिली. विमानाला आग कशी लागली? याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओम्निडायरेक्शनल रेंज लँडिंग हा पायलटसाठी ग्राउंड-आधारित रेडिओ स्टेशनवरून सिग्नल घेऊन विमानात नेव्हिगेट आणि लँडिंग करण्याचा एक मार्ग आहे. रनवेवर सेफ लॅडिंगसाठी मदत लागते.  पायलट धावपट्टी स्पष्टपणे पाहू शकत नाहीत तेव्हा हे लँडिंग उपयुक्त ठरते. या लँडिंगला मॅन्युअल लँडिंग देखील म्हणतात. हे लँडिंग अनेकदा सुरक्षित असते.

बुद्ध एअरलाइन नेपाळची मोठी एअरलाइन कंपनी आहे. या एअरलाइनला २३ एप्रिल १९९६ ला सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त जज सुरेंद्र बहादुर बासनेट यांच्या मुलगा बिरेंद्र बहादुर यांनी ही एअरलाइन कंपनी सुरू केली आहे. ही कंपनी नेपाळमध्ये डोमेस्टिक सेवा देतात. या कंपनीची नेपाळमधील काठमांडू पासून भारतातील वाराणसीसाठी उड्डाण करतात. 

Web Title: A plane full of passengers suddenly caught fire, emergency landing in Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.