न्यूयॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर भयंकर अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, कॅनडा एक्स्प्रेस विमानाच्या समोरच्या भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या घटनेत अनेक जखमी झाले आहेत.
एअर कॅनडा एक्स्प्रेसचे CRJ-900 हे विमान न्यूयॉर्कमधील लागार्डिया विमानतळावर अपघातग्रस्त झाले. या विमानातून १०० लोक प्रवास करत होते.
विमान धडकले, चक्काचूर झाले
विमानतळाच्या धावपट्टीवर उतरल्यानंतर विमान समोर जात होते. त्याचवेळी अग्रिशामक दलाच्या ट्रकला जाऊन धडकले. हा अपघात इतका भीषण होता की, विमानाचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि विमान समोरच्या बाजूने वर उचलले गेले.
या अपघातानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने विमानतळ वाहतुकीसाठी बंद केले आणि इतर सर्व नियोजित विमाने जेकेएफ विमानतळाकडे वळवण्यात आली.
विमान अपघातात किती मृत्यू, किती जखमी?
प्राथमिक रिपोर्ट्सनुसार, अग्निशामक दलाच्या वाहनामध्ये पाच कर्मचारी होते. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून, इतर जखमी झाले आहेत. विमानातील बरेच प्रवासी आणि क्रू मेंबर्स जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा ७० पेक्षा अधिक असल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
विमानाचा समोरचा आणि कॉकपिट पूर्णपणे चेंदामेंदा झाला. ही घटना घडल्यानंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. सर्व प्रवाशांना बाहेर काढून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Web Summary : At LaGuardia Airport, an Air Canada Express plane carrying 100 passengers collided with a fire truck after landing. The plane's front was crushed. Two firefighters died, and many passengers and crew members were injured, with over 70 reported injured. The airport was temporarily closed.
Web Summary : ला गार्डिया हवाई अड्डे पर, एयर कनाडा एक्सप्रेस का विमान उतरने के बाद एक अग्निशमन ट्रक से टकरा गया। विमान में 100 यात्री थे। विमान का सामने का हिस्सा बुरी तरह क्षतिग्रस्त हो गया। दो दमकलकर्मियों की मौत हो गई और कई यात्री और चालक दल के सदस्य घायल हो गए, जिनमें 70 से अधिक घायल बताए गए हैं। हवाई अड्डे को अस्थायी रूप से बंद कर दिया गया।