पुढील २४ ते ४८ तासांत होऊ शकतो मोठा हल्ला, तातडीने इराक सोडा; अमेरिकन दूतावासाचा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:04 IST2026-04-02T14:01:28+5:302026-04-02T14:04:55+5:30

२ दिवसांपूर्वी इराकच्या बगदादमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचे अपहरण करण्यात आले होते. इराकच्या गृह मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केले होते.

A major attack may occur in the next 24 to 48 hours, leave Iraq immediately; US embassy warns | पुढील २४ ते ४८ तासांत होऊ शकतो मोठा हल्ला, तातडीने इराक सोडा; अमेरिकन दूतावासाचा अलर्ट

पुढील २४ ते ४८ तासांत होऊ शकतो मोठा हल्ला, तातडीने इराक सोडा; अमेरिकन दूतावासाचा अलर्ट

इराकची राजधानी बगदाद येथे अमेरिकन दूतावासांनी अत्यंत गंभीर सुरक्षा इशारा जारी केला आहे. इराण पुरस्कृत दहशतवादी संघटना पुढील १-२ दिवसांत बगदादमध्ये टार्गेट हल्ला करू शकतात अशी शक्यता अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. इराणशी निगडित दहशतवादी मिलिशिया संघटना पुढील २४ ते ४८ तासांत बगदादमध्ये हल्ला करू शकतात असं अमेरिकन दूतावासाने त्यांच्या सोशल मीडियावरून अधिकृतपणे सांगितले आहे.

या संभाव्य हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन दूतावासाने इराकमधील सर्व अमेरिकन नागरिकांना मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि कुठल्याही विलंबाशिवाय तातडीने इराक सोडा असं आवाहन करण्यात येत आहे. दूतावासांनी विशेषत: मध्य बगदादचा उल्लेख केला आहे. हा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो कारण याच भागात अनेक परदेशी दूतावास आणि महत्त्वपूर्ण सरकारी इमारती आहेत. मध्य पूर्वेत भू-राजकीय तणाव शिगेला पोहचला आहे आणि अमेरिका इराकमधील त्यांच्या नागरिकांना, दूतावास आणि सैन्य तळांबाबत सुरक्षेची खबरदारी घेत आहे.

अमेरिकन पत्रकाराचे अपहरण

२ दिवसांपूर्वी इराकच्या बगदादमध्ये एका अमेरिकन पत्रकाराचे अपहरण करण्यात आले होते. इराकच्या गृह मंत्रालयाने याबाबत निवेदन जारी केले होते. त्यात परदेशी पत्रकाराचे अपहरण झाल्याचे सांगितले. परंतु संबंधित पत्रकाराची माहिती देण्यास टाळले. सुरक्षा जवानांनी गुप्तचर माहितीच्या आधारे अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी मोहिम सुरू केली. त्यात एका संशयिताला पकडण्यात आले आहे आणि अपहरणात वापरण्यात आलेली कारही जप्त केली आहे. यातील इतर आरोपी फरार आहेत. 

डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये ज्या देशांची जहाजे अडकली आहेत किंवा ज्यांना इराणच्या मार्गाने तेलाचा पुरवठा हवा आहे, त्यांच्यासाठी ट्रम्प यांनी दोनच पर्याय ठेवले आहेत. ट्रम्प म्हणाले, "ज्यांना तेल हवे आहे त्यांनी एकतर स्वतः तिथे जाऊन इराणशी दोन हात करावेत किंवा सरळ अमेरिकेकडून तेल खरेदी करावे. आम्ही आमच्या जवानांचे प्राण इतरांच्या तेलासाठी धोक्यात घालणार नाही." हा इशारा डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रामुख्याने आशियाई आणि युरोपियन देशांना दिले आहे. 

Web Title : अमेरिकी दूतावास ने इराक छोड़ने की चेतावनी दी, हमले का खतरा

Web Summary : बगदाद में अमेरिकी दूतावास ने ईरान समर्थित समूहों द्वारा 48 घंटों के भीतर संभावित हमले की चेतावनी दी है, अमेरिकी नागरिकों को तुरंत इराक छोड़ने का आग्रह किया है। यह एक अमेरिकी पत्रकार के अपहरण और क्षेत्र में बढ़े भू-राजनीतिक तनाव के बाद आया है।

Web Title : US Embassy Warns of Imminent Attack, Urges Citizens to Leave Iraq

Web Summary : The US Embassy in Baghdad warns of a potential attack within 48 hours by Iran-backed groups, urging American citizens to leave Iraq immediately. This follows the kidnapping of a US journalist and heightened geopolitical tensions in the region.