"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 17:59 IST2026-04-06T17:56:49+5:302026-04-06T17:59:33+5:30

Iran rejects US ceasefire proposal: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविराम करण्यासाठी समोर ठेवलेला शस्त्रसंधी प्रस्ताव इराणने धुडकावून लावला आहे. 

"A ceasefire would only give the enemy the opportunity to gather strength to commit more crimes", Iran rejects US proposal to stop the war | "शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला

"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला

"युद्धविराम करणे म्हणजे आपल्या शत्रूंना नव्याने हल्ले करण्यासाठी लागणारी शक्ती जमवण्याची संधी देण्यासारखेच आहे आणि कोणताही शहाणा माणूस असे करणार नाही", असे सांगत इराणने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी प्रस्ताव अक्षरशः धुडकावून लावला. धमक्या आणि अल्टिमेटच्या वातावरणात चर्चा  कदापि होऊ शकत नाही, असे सुनावत इराणने ट्रम्प यांचा पाणउतारा केला. 

इराण आणि अमेरिकेमध्ये शस्त्रसंधीबद्दल चर्चा सुरू असल्याचे बोलले जात असून, याचदरम्यान इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बगाई म्हणाले की, 'युद्धविराम आणि युद्ध संपवण्याबरोबरच इराणच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत.'

शत्रू त्याचे गुन्हे वाढवत चाललाय

बगाई म्हणाले, "मध्यस्थांकरवी मुद्द्यांचे आदान-प्रदान करणे सर्वसामान्य गोष्ट आहे. हे मुद्दे सुरूवातीपासूनच मध्यस्थांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आले आहेत. आपापल्या भूमिकांचे आदान-प्रदान करणे साहजिकच आहे."

"अल्टिमेटम आणि युद्धाच्या काळात विध्वंस घडवण्याच्या धमक्यांसोबत चर्चा कदापि शक्य नाही. आमचा शत्रू एकीकडे हल्ल्यांवर हल्ले करत गुन्ह्यांची संख्या वाढवत असताना सर्व गोपनीय माहिती आणि लक्ष देशाच्या संरक्षणावर असलेच पाहिजे", असेही बगाई यांनी सांगितले. 

"अमेरिकेकडून जेव्हा १५ सूत्री शस्त्रसंधी प्रस्ताव पाठवला गेला. तेव्हाच आम्ही म्हणालो होतो की, हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वकांक्षी, अयोग्य आणि तर्काला धरून नाही. हा प्रस्ताव आम्हाला अजिबात मान्य नाही", असे बगाई अमेरिकेच्या शस्त्रसंधी प्रस्तावाबद्दल म्हणाले.  

हे युद्धातील गुन्ह्याचेच उदाहरण आहे, इराणने ट्रम्प यांना सुनावले

ट्रम्प यांच्याकडून युद्ध सुरु झाल्यापासून इराणला धमक्या दिल्या जात आहेत. एकीकडे ट्रम्प यांच्याकडून हल्ले केले जाणार नाही, असे सांगितले जात असले, तरी इस्रायलचे इराणवरील हल्ले थांबलेले नाहीत. त्यावरून इराणने म्हटले आहे की, "तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या वेळी बोलून देशातील पायाभूत प्रकल्प नष्ट करण्याच्या धमक्या देत आहात आणि नागरी वस्त्यांमध्ये हल्ले करण्याची सूट देऊन ठेवली आहे. हे युद्ध काळातील गुन्ह्यांचे एक चांगले उदाहरण आहे", अशा शब्दात बगाई यांनी ट्रम्प यांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला. 

Web Title : ईरान ने ट्रम्प के युद्धविराम प्रस्ताव को ठुकराया, अमेरिका पर युद्ध अपराधों का आरोप लगाया

Web Summary : ईरान ने ट्रम्प के युद्धविराम प्रस्ताव को खारिज कर दिया, इसे दुश्मनों को फिर से संगठित होने का मौका बताया। ईरान ने जोर देकर कहा कि युद्धविराम और शत्रुता समाप्त होने के साथ-साथ उसकी मांगों को भी पूरा किया जाए, और जारी धमकियों और हमलों को युद्ध अपराध बताया। अल्टीमेटम के बीच चर्चा असंभव है।

Web Title : Iran Rejects Trump's Ceasefire Offer, Accuses US of War Crimes

Web Summary : Iran dismissed Trump's ceasefire proposal, viewing it as a chance for enemies to regroup. Iran insists its demands be met alongside a ceasefire and end to hostilities, criticizing ongoing threats and attacks as war crimes. Discussions are impossible amid ultimatums.