शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
2
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
3
चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
4
'जनता माफ करणार नाही', पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाच्या एआय व्हिडिओवरुन भाजपची जोरदार टीका
5
iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
6
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
7
IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्....
8
लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..
9
एकाच्या बदल्यात २४ फ्री शेअर्स देणार ही कंपनी; ५५९३% चा मल्टीबॅगर रिटर्न, शेअरधारकांना दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट
10
Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
11
रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
12
'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
13
Pawandeep Rajan : "माझे दोन्ही पाय, हात तुटला, कोणीही मदत केली नाही", पवनदीपचा अंगावर काटा आणणारा अनुभव
14
१२ वर्षांखालील मुलांना देऊ नका स्मार्टफोन; अन्यथा नैराश्य, लठ्ठपणाचा मोठा धोका!
15
पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
16
विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार
17
अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...
18
'केंद्र सरकारने सत्य उघडले'; महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा प्रस्तावच पाठवला नाही; सुप्रिया सुळेंची टीका
19
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी..."
20
USD to INR: का होतेय भारतीय रुपयामध्ये घसरण? आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये सामिल
Daily Top 2Weekly Top 5

पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:05 IST

भारत आणि रशियाच्या सैन्य दलांना आतापर्यंत कधीही न मिळालेल्या सुविधा प्रदान करणार आहे. यामुळे चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना धक्का बसू शकतो.

 भारत आणि रशियाच्या मैत्रीपूर्ण संरक्षण संबंधांमध्ये एक ऐतिहासिक टप्पा पार पडला आहे. रशियाच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहाने (स्टेट डूमा) रेसिप्रोकल एक्सचेंज ऑफ लॉजिस्टिक सपोर्ट या महत्त्वाच्या संरक्षण कराराला मंजुरी दिली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी ५ डिसेंबरच्या भारत भेटीपूर्वी हा करार मंजूर होणे, दोन्ही देशांसाठी एक मोठे यश मानले जात आहे.

हा करार भारत आणि रशियाच्या सैन्य दलांना आतापर्यंत कधीही न मिळालेल्या सुविधा प्रदान करणार आहे. यामुळे चीन आणि पाकिस्तानसारख्या देशांना धक्का बसू शकतो.

'RELOS' करार नेमका काय आहे?'RELOS' म्हणजे 'Reciprocal Exchange of Logistic Support'. या करारानुसार, भारत आणि रशियाचे सैन्यदल एकमेकांच्या लष्करी सुविधांचा वापर करू शकणार आहेत. या करारामुळे भारतीय सेना, नौसेना आणि वायुसेना यांना रशियाचे एअरस्पेस, लष्करी तळ , बंदरगाह आणि लॉजिस्टिक्स सपोर्ट वापरण्याचा संपूर्ण हक्क मिळेल. भारतीय विमाने रशियन एअरस्पेसमध्ये परवानगीशिवाय उड्डाण करू शकणार आहेत. याचबरोबर विमानांमध्ये इंधन भरता येईल आणि शस्त्रे तसेच दारूगोळा पुरवता येणार आहे. 

भारतीय जहाजे रशियन बंदरांवर उभी राहून देखरेख आणि दुरुस्ती करू शकतील. या बदल्यात रशियालाही भारतात अशाच प्रकारच्या सुविधा मिळणार आहेत. 

भारताला आर्कटिक प्रदेशात प्रवेशहा करार भारतासाठी केवळ लॉजिस्टिक सपोर्ट नसून एक मोठे रणनीतिक पाऊल आहे. 'RELOS' मुळे भारताला आर्कटिक प्रदेशातील रशियाच्या नौदल बंदरांपर्यंत थेट प्रवेश मिळेल. या भागात रशियाची मोठी लष्करी उपस्थिती आहे. आर्कटिकमध्ये पोहोचल्यामुळे भारतीय नौदलाचा अनुभव वाढेल आणि ध्रुवीय प्रदेशात भारताच्या ऑपरेशनल क्षमतेचा विस्तार होईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia approves military logistics deal with India before Putin visit.

Web Summary : Russia approved a key logistics support agreement allowing India access to Russian military facilities, including airbases and ports. This grants strategic access to the Arctic region and boosts naval operations. Reciprocal access granted to Russia strengthens defense ties, potentially impacting China and Pakistan.
टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाIndian Armyभारतीय जवान