शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

कारण ९८ वर्षाची झाली तरी आई ही आईच असते!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 4:07 PM

या माय-लेकातलं हे नातं पाहून सगळेत अवाक् झाले आहेत.

ठळक मुद्दे98 वर्षाची ही आई आणि ८० वर्षाच्या या मुलांमध्ये फार प्रेम व आपुलकी आहे.अजून लग्न न करता तो मुलगा आपल्या आईसोबतच राहतोय.नर्स असल्याने ती आपल्या मुलाची नीट काळजी घेतेय.

लिवरपुल - या जगात आई आणि मुल यांच्यात एक वेगळंच नातं असतं. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक स्त्रिला आई म्हणूनच जगायला आवडतं. लिव्हरपूल येथील हायटनमधील एक ९८ वर्षीय आई तिच्या ८० वर्षाच्या मुलाच्या देखभालीसाठी एका होमकेअरमध्ये राहायला गेल्याचे वृत्त नुकतंच समोर आलंय. 

अॅडा किटींग आणि टॉम किटींग अशी या दोन मायलेकांची नावं आहेत. वयाच्या ९८ व्या वर्षीही त्या आपल्या ८० वर्षाच्या लेकाची सुश्रुषा करतायेय. टॉम हे गेलं वर्षभर होमकेअरमध्ये राहत आहेत. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत याकरता डॉक्टरांनी त्यांना तेथेच राहण्याचा सल्ला दिला. जेणेकरून तिकडच्या डॉक्टरांकडून टॉमी यांच्यावर योग्यरित्या देखरेख करता येईल. आपला मुलगा आपल्यापासून लांब राहत असल्याने अॅडा यांना अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून आपलं म्हातारपण विसरून त्या आपल्या मुलाकडे त्याची  देखभाल करता यावी याकरता राह्यला गेल्या आहेत. 

आणखी वाचा - ब्रेकअपनंतर त्यांच्या आठवणी विकण्यासाठी तरुणाने सुरु केला बाजार

टॉमी किटिंग आणि अॅडा किटिंग हे मुळचे युनायटेड किंग्डममधील व्हेव्हरट्री शहरातील आहेत. टॉमी यांनी लग्न केलं नसून ते आयुष्यभर अॅडा यांच्यासोबत राहिले आहेत. अॅडा आणि त्यांचे पती हॅरी यांना चार मुलं आहेत. हॅरी याचं निधन झाल्यानंतर अॅडा यांनीच आपल्या मुलांना सांभाळलं. अॅडा या स्वत: एक नर्स असल्याने टॉमीची योग्यरित्या देखभाल करू शकतात. टॉमी हे पेशाने पेंटर आणि डेकोरेटर होते. अॅडा यांची बाकीची तीन मुलं नियमित या होम केअरमध्ये आपल्या आईला आणि भावाला भेटण्यासाठी येत असतात. 

या होम केअरचे व्यव्यस्थापक फिलिप डेनिल्स म्हणतात, ‘या माय-लेकांमध्ये एक वेगळंच नातं आहे. वयाच्या ९८ व्या ‌वर्षीही अॅडा आपल्या मुलाची योग्य काळजी घेतात. त्या स्वत: नर्स असल्याने रुग्णांची देखभाल कशी करावी याचं उत्तम ज्ञान त्यांच्याकडे आहे. तसंच एकाच होम केअरमध्ये आई-लेक एकत्र उपचार घेत असल्याचं पहिलंच उदारहण आहे.’आपल्या रुग्ण मुलाची शुश्रुषा करायला एखादी आई कोणत्याही वयात तयार होते. आईसाठी तिची मुलं सदृढ असणं महत्त्वाचं असतं. म्हणूनच वयाच्या ९८ व्या वर्षी आपल्या मुलाला काहीही कमी पडायला नको म्हणून अॅडा एका होम केअरमध्ये राहू लागल्या आणि बघता बघता त्यांच्या मुलाची स्थिती सुधारु लागली आहे. 

सौजन्य - http://scubby.com

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयWomenमहिला