ब्रेकअपनंतर त्यांच्या आठवणी विकण्यासाठी तरुणाने सुरु केला बाजार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 12:10 PM2017-11-07T12:10:22+5:302017-11-07T12:15:27+5:30

प्रेमाविषयी फार गंभीर असणाऱ्यांना ब्रेकअपनंतर फार त्रास होतो आणि ब्रेकअपचं दु:ख त्यांच्या मनात सलत राहतं.

boy started market to sell memories after breakup | ब्रेकअपनंतर त्यांच्या आठवणी विकण्यासाठी तरुणाने सुरु केला बाजार

ब्रेकअपनंतर त्यांच्या आठवणी विकण्यासाठी तरुणाने सुरु केला बाजार

Next
ठळक मुद्देआम्हाला कोणत्याही बंधनात अडकायचं नाहीए. आम्हाला स्वतंत्र आणि मोकळ्या पद्धतीने जगायचंय. ही संकल्पना व्हिएतनामध्ये सोशल मीडियातून प्रचंड व्हायरल झालीसध्या जमाना सोशलाईज्ड झालाय. प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर शोधली जाते.

व्हिएतनाम - गेल्या काही वर्षात ब्रेकअपचं प्रमाण सगळ्याच देशात खूप वाढलंय. आपल्या जोडीदाराशी पटलं नाही की लगेच वेगळं होण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे प्रेमाविषयी फार गंभीर असणाऱ्यांनाच फार त्रास होतो. ब्रेकअपचं दु:ख त्यांच्या मनात सलत राहतं. यातून ब्रेकअपवर अनेक गाणी ऐकून, चित्रपट बघून आपलं दु:ख हलकं करत असतात. पण व्हिएतनाममध्ये आपलं दु:खं हलकं करण्यासाठी एका तरुणाने हटके उपाय शोधून काढलाय. या तरुणाने रिलेशनशिपमध्ये असताना मिळालेले गिफ्ट्स विकण्यासाठी एक बाजारच तयार केलाय. बघता बघता या बाजारात अनेक प्रेमींनी भेट दिली आणि त्यांनीही त्यांच्या आठवणी येथे विकायला काढल्या. या बाजारात तुम्हाला कपड्यांपासून ग्रिटींग्सपर्यंत आणि अगदी वापरलेलं टूथब्रशही  मिळले. 

या बाजाराची कल्पना ज्याने काढली तो डिन्ह थांग म्हणाला की, ‘तरुण मुलं फार स्पष्टवक्ते आणि खुल्या मनाचे असतात. आपल्याला आलेलं दु:ख एकट्यानेच भोगण्यापेक्षा ते इतरांसोबत त्यांना वाटायला आवडतं. आपलं दु:ख इतरांना शेअर करायला आवडतं. या बाजारात खरेदी करण्याच्या उद्देशाने ग्राहक येतील आणि त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचं मन हलकं होईल, या आशेनेच हा उपक्रम राबवायचं ठरवलं’. ब्रेकअप झालेले प्रेमी येथे येतात. त्यांना नको असलेल्या आठवणी येथे विकायला ठेवतात.  त्यातून त्यांचा वेळही जातो आणि एक एक आठवणी विकल्या जाताएत याचा आनंदही होतो. या बाजारात तुम्हाला कपडे, ग्रिटींग्स, पुस्तकं आणि इतर भेटवस्तू सापडतील. 

सध्या जमाना सोशलाईज्ड झालाय. प्रत्येक गोष्ट इंटरनेटवर शोधली जाते. तरुण इंटरनेटवर भेटतात, प्रेमात पडतात, एकमेकांना ऑनलाईनच डेट करतात, आणि ब्रेकअपही ऑनलाईन होतात. व्हिएतनाममध्ये गेल्या काही वर्षात घटस्फोटाचेही प्रमाण वाढलं असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे स्त्री आणि पुरुष हे दोन्हीही नातेसंबंधामुळे नैराश्यात गेलेत. म्हणूनच या बाजारातही बरीच गर्दी वाढली आहे.

फेब्रुवारी २०१७ मध्ये या बाजाराची स्थापना झाली आणि बघता बघता इथे अनेक प्रेमिकांनी आपल्या वस्तू बाजारात विकायला ठेवल्या आहेत. ही संकल्पना व्हिएतनामध्ये सोशल मीडियातून प्रचंड व्हायरल झाली आणि त्यामुळेच येथे वस्तू विकत घेण्यासाठीही ग्राहकांचा ओघ वाढत गेला.  या संकल्पनेचे जनक डिन्ह थांग यांनी आता नव्या वस्तू विकण्यासाठीही नव्या विक्रेत्यांना परवानगी दिली आहे, त्याचप्रमाणे पुढल्यावर्षी अशीच संकल्पना व्हिएतनाच्या राजधानीत म्हणजेच हो ची मिन्ह या शहरातही राबवणार आहेत. 

‘आम्हाला कोणत्याही बंधनात अडकायचं नाहीए. आम्हाला स्वतंत्र आणि मोकळ्या पद्धतीने जगायचंय. म्हणूनच आम्हाला एखाद्या व्यक्तीचा कंटाळा आला तर आम्ही त्यांना सोडून जातो आणि नवी व्यक्ती शोधतो. सध्या इंटरनेटमुळे अशा गोष्टी फार सोप्या झाल्या आहेत,’ असंही येथील एका २५ वर्षीय तरुणाने सांगितलंय. अशा वृत्तीमुळेच ब्रेकअपचं प्रमाण वाढलं असून अशा प्रवृत्तींपासून तरुणांना मुक्त केलं पाहिजे असंही काहीजण सांगतात. 

Web Title: boy started market to sell memories after breakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.