864 deaths in 24 hours from coronavirus in spain and more than 851000 infected worldwide sna | स्‍पेनमध्ये 24 तासांत 864 जणांचा मृत्यू, जगभरात 8,51,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण

स्‍पेनमध्ये 24 तासांत 864 जणांचा मृत्यू, जगभरात 8,51,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण

ठळक मुद्देजगभरात कोरोणामुळे मरणारांची संख्या 42,053 वर कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये गेल्या 24 तासांत 138 जणांचा मृत्यू ब्रिटेनमध्ये 24 तासांत 381 जणांचा मृत्यू


माद्रिद/वाशिंगटन : स्‍पेनमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 864 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संक्रमित लोकांचा आकडा 1,02,136 वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे स्पेनमध्ये 9,053 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगात तब्बल 8,51,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 42,053 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये गेल्या 24 तासांत 138 जणांचा मृत्यू झाला. याच बरोबर तेथील मृतांचा आकडा आता 3,036 वर पोहोचला आहे. तेथे कोरोना बाधितांची संख्या 47,593 आहे. यापैकी 15,473 लोक बरे झाले आहेत.

अमेरिकेचे 9/11च्या हल्ल्यापेक्षाही मोठे नुकसान -

कोरोना व्हायरसपुढे महास्ता म्हणवला जाणारा अमेरिकाही पुरता हतबल झाला आहे. अमेरिकेत बुधवारी कोरोना व्हायरसमुळे मरणाऱ्यांचा आकडा 4,000 वर जाऊन पोहोचला. या आकड्याने अमेरिकेवर 9/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या आकड्यालाही मागे टाकले आहे. 2001मध्ये झालेल्या या हल्लात जवळपास ३ हजार अमेरिन नागरिकांचा मृत्यू झाला होता. येथील 190,000 हून अधिक लोक कोरोना संक्रमित आहेत. 

ब्रिटेनमध्ये 24 तासांत 381 जणांचा मृत्यू -

ब्रिटनमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 381 जणांचा मृत्यू झला. याच बरोबर येथील मृतांचा आकडा आता  1,800वर पोहोचला आहे. लंडन येथील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे 13 वर्षीय मुलाचाही मृत्यू झाल्याचे समजते. यापूर्वी बेल्जियममध्ये मंगळवारी एका 12 वर्षांच्या मुलीचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. ही मुलगी युरोपातील सर्वात कमी वय असलेली कोरोनाग्रस्त असल्याचे मानले जात आहे.

 हा जीवन मराणाचा प्रश्न आहे - ट्रम्प

अमेरिकन नागरिकांसाठी 30 दिवसांपर्यंत नियमांचे पालन करणे नक्कीच कठीन गोष्ट आहे. मात्र हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांन दोन दिवसांपूर्वीच सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा कालावधी 30 एप्रिलपर्यंत वाढवला होता. एवढेच नाही, तर कोरोनाची तुलना फ्लूशी करणे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले होते. कठोर नियम केलेले असतानाही मरणारांची संख्या एक ते दो लाखांपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता व्हाईट हाऊस टास्क फोर्सच्या सदस्य डेबोरा ब‌र्क्स यांनी व्यक्त केली आहे.
 

 

 

Web Title: 864 deaths in 24 hours from coronavirus in spain and more than 851000 infected worldwide sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.