'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:14 IST2025-10-07T09:11:39+5:302025-10-07T09:14:50+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील टॅरिफ दुप्पट करून ५० टक्के केले आहेत, यामध्ये भारताकडून रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर अतिरिक्त २५ टक्के शुल्कचा समावेश केला आहे.

'७ विमाने पाडली होती', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा जुनाच सूर लावला; भारत आणि पाकिस्तानबद्दल काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तावर भाष्य केले आहे. दोन्ही देशातील संघर्ष केवळ टॅरिफच्या मदतीनेच संपवता येईल, असे त्यांनी सांगितले. युद्धबंदीचा निर्णय द्विपक्षीय होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय लष्कराने ७ मे रोजी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले, यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये चार दिवसांचा संघर्ष सुरू झाला. नंतर पाकिस्तानच्या पोलिस महासंचालकांच्या विनंतीवरून युद्धविराम जाहीर करण्यात आला.
वर्गात मित्राला कसे मारायचे? ChatGPT वर एक प्रश्न विचारला; विद्यार्थ्याला तुरुंगात जावे लागले
"जर माझ्याकडे टॅरिफची शक्ती नसती, तर सातपैकी किमान चार युद्धे चालूच असती, जर तुम्ही भारत आणि पाकिस्तानकडे पाहिले तर ते या दिशेने वाटचाल करत होते. सात विमाने पाडण्यात आली होती. टॅरिफमुळे अमेरिकेला केवळ आर्थिक फायदा झाला नाही तर शांतता प्रस्थापित करण्यासही मदत झाली आहे."मी नेमके काय बोललो ते मी सांगू इच्छित नाही, पण मी जे बोललो ते खूप प्रभावी होते. आम्ही केवळ अब्जावधी डॉलर्स कमावत नाही, तर टॅरिफमुळे आम्ही शांतता प्रस्थापित करणारे देखील बनलो आहोत',असेही डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ हल्ला
ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवरील टॅरिफ दुप्पट करून ५० टक्के केले आहेत. यामध्ये भारताकडून रशियन कच्च्या तेलाच्या खरेदीवर २५ टक्के अतिरिक्त शुल्कचा समावेश आहे. रशियाच्या तेलाच्या खरेदीमुळे अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून भारताला लक्ष्य केले जात असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
लवकर करार होण्याची आशा
नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी सोमवारी भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापार करार होईल असा विश्वास व्यक्त केला. दोन्ही देश परस्पर फायदेशीर द्विपक्षीय व्यापार करारासाठी वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. भारताने टॅरिफ आणि नॉन-टेरिफ अडथळे कमी करावेत आणि उत्पादन क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी आपली बाजारपेठा खुली करावीत, असेही सुब्रह्मण्यम यांनी म्हटले.