अमेरिकेतील सुरक्षित मानल्या जाणाऱ्या न्यूयॉर्क शहराच्या ब्रुकलिन परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. दोन गुंडांच्या हाणामारीत एका अवघ्या ७ महिन्यांच्या चिमुरडीचा निष्पाप बळी गेला आहे. काओरी असं या चिमुरडीचं नाव असून, ती आपल्या आईसोबत स्ट्रोलरमध्ये फिरत असताना एका सुसाट आलेल्या गोळीने तिचा वेध घेतला. बुधवारी भरदिवसा घडलेल्या या घटनेने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
१ एप्रिल रोजी लियाना चार्ल्स-मूर ही आई आपल्या ७ महिन्यांच्या मुलीला आणि २ वर्षांच्या मुलाला घेऊन ब्रुकलिनच्या रस्त्यावरून जात होती. अचानक दोन गुंड मोपेडवरून आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. सुरुवातीला लियानाला वाटले की कुठेतरी फटाके फुटत आहेत. स्वतःचा आणि मुलांचा जीव वाचवण्यासाठी ती जवळच असलेल्या एका दुकानात शिरली.
आईने कव्हर हटवलं अन्...
दुकानात गेल्यावर लियानाने आपल्या २ वर्षांच्या मुलाला सावरलं आणि त्यानंतर स्ट्रोलरमधील चिमुरड्या काओरीकडे पाहिले. तिने स्ट्रोलरचे वरचे कव्हर बाजूला सारले, तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. काओरीच्या डोक्यात गोळी लागली होती आणि ती रक्ताच्या थारोळ्यात होती. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या गोळीबारात काओरीच्या २ वर्षांच्या भावालाही गोळी घासून गेली आहे.
सीसीटीव्हीमध्ये थरार कैद
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गोळीबार गँगवॉरमध्ये झाला असून काओरी ही या गुंडांचे लक्ष्य नव्हती. मोपेडवरून आलेल्या दोन हल्लेखोरांपैकी मागे बसलेल्या गुंडाने बेछूट गोळीबार केला. पळून जात असताना या गुंडांची मोपेड एका कारला धडकली, ज्यामध्ये एक गुंड जखमी झाला. पोलिसांनी संशयावरून एकाला ताब्यात घेतले असून दुसऱ्याचा शोध घेण्यासाठी संपूर्ण न्यूयॉर्कमध्ये मोठी शोधमोहीम सुरू केली आहे.
महापौरांनी व्यक्त केला शोक
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "काओरीची हत्या ही कधीही न भरून येणारी हानी आहे. आपण या हिंसाचाराला सामान्य मानू शकत नाही. अनेक कुटुंबांनी अशा वेदना सहन केल्या आहेत," असे ट्विट त्यांनी केले आहे. न्यूयॉर्क पोलीस आयुक्त जेसिका टिश यांनी या घटनेला "माणुसकीला काळिमा फासणारी शोकांतिका" असे म्हटले आहे.
Web Summary : A 7-month-old baby was fatally shot in Brooklyn during a gang-related shootout. The mother initially thought firecrackers exploded. The infant was hit while in a stroller, a tragic victim of senseless violence.
Web Summary : ब्रुकलिन में गैंगवार के दौरान एक 7 महीने की बच्ची की गोली लगने से मौत हो गई। माँ को पहले लगा कि पटाखे फूट रहे थे। बच्ची स्ट्रोलर में थी तभी उसे गोली लग गई, जो एक दुखद घटना है।