6 people, including police officer killed in New Jersey shooting | न्यू जर्सीमध्ये गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू
न्यू जर्सीमध्ये गोळीबार, पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू

वॉशिंग्टन : अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये बुधवारी झालेल्या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना न्यू जर्सी शहरातील बेव्यू भागात असेल्या एका दुकानाच्या बाहेर घडली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेव्यू आणि मार्टिन ल्यूथर किंग रोडजवळ दुपारी झालेल्या गोळीबारानंतर परिसरात अलर्ट जारी करण्यात आला. तसेच, यावेळी येथील शाळा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. 

याशिवाय, पोलिसांचे इमर्जन्सी सर्व्हिस युनिट्स सुद्धा घटनास्थळी पाठविण्यात आले आहे. या गोळीबारात एका पोलीस अधिकाऱ्यासह तीन नागरिकांचा मृत्यू झाला. तर याच ठिकाणी दोन संशयित हल्लेखोरांचा सुद्धा खात्मा करण्यात आल्याचे समजते. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोरांची ओळख पटली की नाही, याबाबत अद्याप कोणतीच माहिती दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

Web Title: 6 people, including police officer killed in New Jersey shooting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.