अमेरिकेत कंटेनरमध्ये आढळले ४६ मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 12:26 IST2022-06-29T12:25:14+5:302022-06-29T12:26:20+5:30

काही लाेकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक अधिकारी तपासणीसाठी गेला, त्यावेळी खाली एक मृतदेह आढळला. उष्णतेमुळे कंटेनरचे तापमान वाढले.

46 bodies found in containers in US | अमेरिकेत कंटेनरमध्ये आढळले ४६ मृतदेह

अमेरिकेत कंटेनरमध्ये आढळले ४६ मृतदेह

टेक्सास : रस्त्याच्या कडेला उभ्या करण्यात आलेल्या एका ट्रकमध्ये तब्बल ४६ मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. १६ जणांचा प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  मानव तस्करीचा हा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. 
प्राप्त माहितीनुसार, टेक्सासच्या सॅन एंटाेनियाे शहरात १८ चाकी कंटेनर ट्रक आढळला. कंटेनरमध्ये १०० हून अधिक लाेकांना अक्षरश: काेंबण्यात आले हाेते. 

काही लाेकांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून एक अधिकारी तपासणीसाठी गेला, त्यावेळी खाली एक मृतदेह आढळला. उष्णतेमुळे कंटेनरचे तापमान वाढले. त्यामुळे या लाेकांना उष्माघात आणि श्वास काेंडण्याचा त्रास झाला असण्याचा अंदाज आहे. अनेक जण तापाने फणफणत हाेते. कंटेनरमध्ये पाणीही उपलब्ध नव्हते. 
 

Web Title: 46 bodies found in containers in US