कोरोनाचे ३१०० बळी; ७० देशांत संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 04:26 AM2020-03-04T04:26:55+5:302020-03-04T04:27:04+5:30

देशात कोरोनाची लागण सुरू झाल्यापासूनची संसर्ग झालेल्या नागरिकांची मंगळवारची ही संख्या सर्वात कमी आहे.

3100 victims of Corona; Infection in 70 countries | कोरोनाचे ३१०० बळी; ७० देशांत संसर्ग

कोरोनाचे ३१०० बळी; ७० देशांत संसर्ग

Next

बीजिंग : चीनमध्ये कोरोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या २९४३ वर पोहोचली आहे. देशात कोरोनामुळे आणखी ३१ जणांचा मृत्यू झाला असून नवे १२५ रुग्ण समोर आले आहेत. देशात कोरोनाची लागण सुरू झाल्यापासूनची संसर्ग झालेल्या नागरिकांची मंगळवारची ही संख्या सर्वात कमी आहे.
चीनमधील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचे सांगितले जात असले तरी जगात मात्र या घातक आजाराने पाय पसरले आहेत. आतापर्यंत जगात विविध भागांत ३१०० पेक्षा अधिक लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे, तर संसर्गाचे ९०००० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने मंगळवारी सांगितले की, सोमवारी कोरोनामुळे आणखी ३१ जणांचा मृत्यू झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगात ७० देशांत कोरोना (कोविड-१९) पसरला असून आतापर्यंत ३०५६ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ८९५२७ लोकांना संसर्ग झाला आहे. ज्या ३१ जणांचा मृत्यू झाला आहे ते सर्व हुबेई प्रांतातील आहेत आणि या प्रांताची राजधानी वुहानचे रहिवासी होते. नव्या १२५ रुग्णांपैकी ११४ हुबेईचे आहेत. आयोगाने सांगितले की, सोमवारपर्यंत चीनमधील रुग्णांची संख्या ८०१५१ झाली आहे. यात २९४३ लोेकांचा मृत्यू झाला आहे. ३०००४ रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर ४७२०४ लोकांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज दिला आहे.
>‘उन्हाळ्यापर्यंत उपचार उपलब्ध होईल’
अमेरिकेत कोरोना विषाणूंमुळे आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला असून ९१ जणांना संसर्ग झाला आहे. ज्या सहा जणांचा मृत्यू झाला आहे ते सर्व वॉशिंग्टनमधील होते. संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी ४३ स्थानिक, तर विदेशातून आलेले ४८ जण आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी उपराष्ट्राध्यक्ष पेन्स, आरोग्य अधिकारी यांच्यासह व्हाइट हाउसमध्ये परिस्थितीची समीक्षा केली. पत्रकारांशी बोलताना पेन्स यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. उन्हाळ्यापर्यंत कोरोनावर उपचार उपलब्ध होऊ शकतो.
>इराणमध्ये संसदेच्या २३ सदस्यांना संसर्ग
इराणमध्ये आणखी ११ लोकांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींची संख्या आता ७७ वर पोहोचली आहे. उप आरोग्यमंत्री अलीरेजा रइसी यांनी सांगितले की, आतापर्यंत २३३६ लोकांना याचा संसर्ग झाला आहे. यात ८३५ नवे रुग्ण आहेत. दरम्यान, इराणमधील संसदेच्या २३ सदस्यांनाही हा संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. सरकारने सैन्याला आदेश दिला आहे की, त्यांनी आरोग्य विभागाला मदत करावी.

Web Title: 3100 victims of Corona; Infection in 70 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.