एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 14:27 IST2025-05-25T14:27:18+5:302025-05-25T14:27:45+5:30

चार दिवसांपूर्वीच एका आर्मी पब्लिक स्कूलच्या बसवर हल्ला झाला होता.

3 vehicles blown up one by one; Terrorist attack on Pakistani army, 32 soldiers killed | एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू

एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू

पाकिस्तानने जन्माला घातलेला दहशतवाद आता त्यांच्यासाठी घातक ठरत आहे. दहशतवाद्यांना आश्रय देण्याची किंमत आता संपूर्ण पाकिस्तानला मोजावी लागत आहे. खुजदारमधील झिरो पॉइंटजवळ कराची-क्वेट्टा महामार्गावर लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 32 पाकिस्तानी सैनिक ठार झाले, तर डझनभर जखमी झाले आहेत.

पाकिस्तानच्या दुर्गम भागातून दहशतवादी घटनांच्या बातम्या येणे सामान्य होते, परंतु आता पाकिस्तानच्या मोठ्या शहरांमध्येही असे हल्ले होऊ लागले आहेत. यामुळे तेथील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

कारमध्ये स्फोट 
कराची-क्वेट्टा महामार्गाजवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये स्फोटक ठेवण्यात आले होते. लष्कराचा ताफा तेथून जात असताना त्याचा स्फोट झाला. ताफ्यात आठ लष्करी वाहने होती, ज्यापैकी तीन वाहनांना थेट फटका बसला, ज्यामध्ये लष्करी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना घेऊन जाणाऱ्या बसचाही समावेश होता.

घटना लपवण्याचा प्रयत्न
अधिकारी ही सुरक्षा त्रुटी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतर्गत सूत्रांनुसार, अधिकारी या घटनेला स्कूल बसवरील हल्ला म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

याआधीही हल्ला झालेला
21 मे रोजी कराची-क्वेट्टा महामार्गावर आणखी एक हल्ला झाला होता. बलुचिस्तानमधील खुजदार शहराजवळ क्वेट्टा-कराची महामार्गावर मुलांना घेऊन जाणाऱ्या आर्मी पब्लिक स्कूलच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. ज्यामध्ये ड्रायव्हरसह पाच मुलांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे पाकिस्तानातील सामान्य जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: 3 vehicles blown up one by one; Terrorist attack on Pakistani army, 32 soldiers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.