भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:15 IST2025-05-03T16:15:04+5:302025-05-03T16:15:32+5:30
२०२१ पासून आतापर्यंत जवळजवळ ४ वर्षे ही मुलं घराबाहेर पडली नव्हती. ८ ते १० वर्षांची ही मुलं आहेत, ज्यामध्ये दोन जुळ्या भावंडांचा आणि एका मोठ्या भावाचा समावेश आहे.

भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
स्पेनमधील ओविएदो शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोना काळापासून पालकांनी घरात कोंडून ठेवलेल्या घरातून तीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. २०२१ पासून आतापर्यंत जवळजवळ ४ वर्षे ही मुलं घराबाहेर पडली नव्हती. ८ ते १० वर्षांची ही मुलं आहेत, ज्यामध्ये दोन जुळ्या भावंडांचा आणि एका मोठ्या भावाचा समावेश आहे.
रिपोर्टनुसार, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे मुलांच्या पालकांनी खूप कडक नियम बनवले होते. त्यांनी आपल्या मुलांना समाजापासून पूर्णपणे वेगळं केलं होतं. घराबाहेर पडणं, शाळेत जाणं, कोणालाही भेटणं, सर्वकाही बंद केलं होतं. मुलांना खिडकीतून बाहेर पाहण्याची देखील परवानगी नव्हती.
मुलांची अवस्था पाहून सर्वांनाच मोठा धक्का
शेजाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं की, त्यांनी बऱ्याच दिवसांपासून या मुलांना बाहेर खेळताना किंवा शाळेत जाताना पाहिलं नाही, त्यानंतर ही घटना उघडकीस आली. जेव्हा अधिकाऱ्यांनी घरी पोहोचून चौकशी केली तेव्हा धक्कादायक सत्य बाहेर आलं. मुलांची अवस्था पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला.
मुलांना घराबाहेर काढताच ते आनंदी झाले
मुलांना घराबाहेर काढताच ते आनंदी झाले, त्यांच्या चेहऱ्यावर असे काही भाव होते जणू काही त्यांना कधीच ताजी हवा अनुभवताच आली नाहा. असं वाटत होतं की मुलं पहिल्यांदाच बाहेरचं जग पाहत आहेत. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
पालकांना अटक
मुलांच्या पालकांना अटक करण्यात आली आहे. आईचे वय ४८ वर्षे होतं, तर वडिलांचं वय ५३ वर्षे आहे. त्याच्यावर घरगुती हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. हे 'कोविड सिंड्रोम' नावाच्या मानसिक आजाराने ग्रस्त होते, ज्यामुळे ते साथीचा रोग संपल्यानंतरही अत्यंत सावध राहिले. ही मुलं जर्मन नागरिक आहेत आणि त्यांनी त्यांच्या आयुष्यातील ४ वर्षे फक्त चार भिंतींमध्ये घालवली. आता प्रशासन त्यांची काळजी घेत आहे.