२० बांधकाम मजुरांची बलुचिस्तानात हत्या
By Admin | Updated: April 12, 2015 01:26 IST2015-04-12T01:26:32+5:302015-04-12T01:26:32+5:30
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी पंजाबी, सिंधी मजुरांच्या तात्पुरत्या निवाऱ्यावर हल्ला केला. यात २० मजूर ठार झाले.

२० बांधकाम मजुरांची बलुचिस्तानात हत्या
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी पंजाबी, सिंधी मजुरांच्या तात्पुरत्या निवाऱ्यावर हल्ला केला. यात २० मजूर ठार झाले.
तुर्बतच्या गगदान भागातील पुलाचे बांधकाम करत असलेले मजूर आपापल्या राहुटीत झोपले होते. तेव्हा बंदूकधाऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती पोलीस अधिकारी इम्रान कुरेशी यांनी दिली. दहशतवादी दुचाकीवरून आले होते व दुपारी दोन वाजता त्यांनी मजुरांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. ठार झालेल्या मजुरांपैकी १६ पंजाबचे, तर चार मजूर सिंध प्रांताचे आहेत. हल्ल्यामध्ये तीन मजूर जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही; मात्र बलुचिस्तानचे दहशतवादी नेहमीच पंजाबी नागरिकांना लक्ष्य करत आले आहेत. पंजाब प्रांतातील लोक बलुचिस्तानाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करतात, असे बलुच नागरिकांना वाटते.(वृत्तसंस्था)