सोशल मीडिया पोस्टमुळे १९ भारतीयांसह ३५ जणांना अटक! युद्धकाळात अफवा पसरवणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 19:17 IST2026-03-16T19:16:43+5:302026-03-16T19:17:48+5:30

संयुक्त अरब अमिरातीने खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.

19 Indians Among 35 Arrested in UAE for Posting Fabricated War Videos on Social Media | सोशल मीडिया पोस्टमुळे १९ भारतीयांसह ३५ जणांना अटक! युद्धकाळात अफवा पसरवणे पडले महागात

सोशल मीडिया पोस्टमुळे १९ भारतीयांसह ३५ जणांना अटक! युद्धकाळात अफवा पसरवणे पडले महागात

UAE Action: मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीने मोठी कारवाई केली आहे. सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि खोटे व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी १९ भारतीयांसह एकूण ३५ जणांना अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर या आरोपींवर जलद गतीने खटला चालवला जाणार आहे.

युएईच्या अ‍ॅटर्नी जनरलने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या ३५ व्यक्तींची विभागणी तीन गटांत करण्यात आली आहे. यात सर्वाधिक १९ भारतीय नागरिकांचा समावेश आहे. अमेरिका-इस्रायली सैन्याने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव वाढला आहे. या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवल्याचा ठपका या सर्वांवर ठेवण्यात आला आहे.

आरोपींचे तीन गट

पहिला गट: या गटातील १० जणांनी ज्यात ५ भारतीय आहेत देशाच्या आकाशात क्षेपणास्त्रे रोखली जात असल्याचे खरे व्हिडिओ चित्रित केले. मात्र, त्याला भीतीदायक साऊंड इफेक्ट्स आणि कमेंटरी सांगून लोकांमध्ये घबराट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेची माहिती शत्रू राष्ट्रांना मिळण्याचा धोका निर्माण झाला.

दुसरा गट: या गटात ७ जणांचा समावेश आहे (ज्यात ५ भारतीय आहेत). यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून बनावट व्हिडिओ तयार केले. परदेशातील स्फोटांचे किंवा आगीचे व्हिडिओ हे युएईमधीलच असल्याचे भासवून ते सोशल मीडियावर शेअर केले. यात युएईचा राष्ट्रध्वज आणि तारखांचा वापर करून ते खरे असल्याचे भासवले गेले.

तिसरा गट: या गटातील ६ जणांनी (ज्यात ५ भारतीय आहेत) इराण आणि त्यांच्या लष्करी नेतृत्वाचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ पोस्ट केले. इराणच्या लष्करी कारवायांचे यश म्हणून वर्णन करून त्यांनी युएईच्या राष्ट्रीय हिताला बाधा पोहोचवल्याचा आरोप आहे.

कठोर शिक्षेची तरतूद

युएईच्या कायद्यानुसार, अशा प्रकारे अफवा पसरवणे किंवा राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणे हा गंभीर गुन्हा आहे. यासाठी किमान १ वर्षाचा तुरुंगवास आणि किमान १ लाख दिराम (सुमारे २३ लाख भारतीय रुपये) दंडाची तरतूद आहे. मुलांच्या भावनांचा वापर करून सुरक्षा धोक्यात असल्याचे व्हिडिओ बनवणाऱ्यांवरही कडक कारवाई केली जाणार आहे.

युएईमधील सध्याची परिस्थिती

इराणने युएईमधील तीन प्रमुख बंदरे रिकामी करण्याचा इशारा दिल्यानंतर तणाव आणखी वाढला आहे. अमेरिकेने इराणच्या तेल निर्यात केंद्रावर हल्ले करण्यासाठी युएईच्या बंदरांचा वापर केल्याचा आरोप तेहरानने केला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्यासाठी मित्रराष्ट्रांना युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे.

Web Title : युद्ध अफवाह फैलाने पर यूएई में 35 गिरफ्तार, 19 भारतीय शामिल

Web Summary : यूएई ने सोशल मीडिया पर झूठी युद्ध संबंधी जानकारी फैलाने के आरोप में 19 भारतीयों सहित 35 लोगों को गिरफ्तार किया। उन पर दहशत पैदा करने, नकली वीडियो साझा करने और ईरानी सैन्य कार्रवाई का समर्थन करने का आरोप है, जिससे राष्ट्रीय सुरक्षा खतरे में पड़ सकती है। कड़ी सजा का प्रावधान है।

Web Title : 35 Arrested in UAE for Spreading War Rumors, Including 19 Indians

Web Summary : UAE arrested 35, including 19 Indians, for spreading false war-related information on social media. They face charges of creating panic, sharing fake videos, and supporting Iranian military actions, potentially endangering national security. Stiff penalties apply.