टेक्सास : अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील आर्लिंग्टन येथे एका कुटुंबातील १५ जण आपल्या नातेवाईकाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जमले होते. त्यातील एकानेही मास्क घातला नव्हता. त्या सर्वांना कोरोना संसर्गाची लागण झाला असून त्यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
त्यापैकी अॅलेक्सा अॅरागॉनेझ या कोरोनाने आजारी असून रुग्णालयात उपचार घेत आहेत. आपल्या कुटुंबाने केलेल्या निष्काळजीपणाची कहाणी अॅलेक्सा यांनी एका चित्रफितीमध्ये सांगितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कोरोना संसर्गाचा फैलाव वाढलेला असताना आम्ही योग्य ती काळजी घेतली नाही. वाढदिवसाच्या छोटेखानी समारंभात १५ जणच असले तरी एकानेही मास्क घातलेला नव्हता.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: 15 members of the family suffer from corona without wearing a mask
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.