जळत्या मेणबत्तीजवळ थांबून लावत होता डिओड्रन्ट, अचानक झाला मोठा स्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 10:16 AM2021-10-14T10:16:26+5:302021-10-14T10:17:52+5:30

हा स्फोट इतका भीषण होता की, घराच्या काचा फुटल्या आणि संपूर्ण घरात आग पसरली.

13 year old boy used Deodorant near burning candle, suddenly big explosion happened | जळत्या मेणबत्तीजवळ थांबून लावत होता डिओड्रन्ट, अचानक झाला मोठा स्फोट

जळत्या मेणबत्तीजवळ थांबून लावत होता डिओड्रन्ट, अचानक झाला मोठा स्फोट

Next

लंडन: आपण सर्वजण अनेकदा शरीराची दुर्गंधी दूर करण्यासाठी डिओड्रन्ट लावत असतो. या डिओड्रन्टमध्ये अल्कोहोल असल्यामुळे याला ज्वलनशील पदार्थांपासून दूर ठेवण्याची वॉर्निंग डिओच्या बाटलीवर दिलेली असते. तरीदेखील अनेकवेळा या डिओड्रन्टमुळे आग लागल्याच्या घटना घडतात. अशाच प्रकारची एक घटना ब्रिटेनमध्ये घडली. पण, या घटनेत फक्त आगच लागली नाही, तर मोठा स्फोट होऊन 70 लोकांचा जीव धोक्यात गेला. 

'द सन'च्या वृत्तानुसार, ब्रिटनमध्ये एका 13 वर्षीय मुलाने जळत्या मेणबत्तीजवळ डिओ लावण्याचा मुर्खपणा केल्याने मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुलाच्या आईने सांगितले की, मुलगा डिओड्रन्ट लावत होता, त्यावेळी त्याच्या जवळ एक मेणबत्ती ठेवलेली होती. त्यावर डिओड्रन्टचे काही थेंब उडाले आणि अचानक आग लागली. ही घटना घडली तेव्हा तेरा वर्षीय मुलगा घरात एकटाच होता.

दरम्यान आग लागताच बेडरुममध्ये मोठा स्फोट झाला आणि हळुहळू आग घरात पसरली. यावेळी इमारतीमधील कोणीतरी अग्निशमन दलाला बोलावले. सूचना मिळताच सुमारे अग्निशामक दलाचे सत्तर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. रात्री 8 च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला. इमारतीत अचानक लागलेल्या आगीनंतर जीव वाचवण्यासाठी इमारतीमधील इतर लोक इमारत सोडून खाली पळाले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: 13 year old boy used Deodorant near burning candle, suddenly big explosion happened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app