शहरं
Join us  
Trending Stories
1
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
2
"मला किती दिवस जेलमध्ये ठेवायचं याचं उत्तर फक्त पंतप्रधानच देऊ शकतात"
3
'अबकी बार ४०० पार' कुठल्या भरवशावर?; मंत्री एस जयशंकर यांनी सांगितलं लॉजिक
4
“तो येवल्यावाला आम्हाला बधीर समजतो काय?”; मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर पुन्हा टीका
5
PK यांचा नवा दावा! जर मोदी सत्तेत आले तर १०० दिवसांत 'हा' मोठा निर्णय होऊ शकतो
6
४ दिवसांत ४ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन; राम मंदिराला दिले दीड कोटींचे दान
7
शेजारी देशांमध्ये शंभरावर मृत्यू, राजस्थानात पारा ४८.८ अंशांवर; एकाच दिवसात पाच जण दगावले
8
पोर्शे कार अपघात प्रकरणावर मुनव्वर फारुकीचं ट्वीट; म्हणाला, "मी १७ वर्षांचा असताना..."
9
“काँग्रेस संपली, आता कुठे दिसणार नाही”; असं खरगे खरंच म्हणाले? वाचा, व्हायरल व्हिडिओचं सत्य!
10
Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल
11
Life Lesson: जर तुम्ही चाळीशीच्या उंबरठ्यावर असाल तर पुढील चाळीस वर्षांसाठी बळ देणारी ही गोष्ट वाचा!!
12
"...नाहीतर मलाच जेलमध्ये घालतील"; सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याची पोर्शे कार अपघातावर संतप्त प्रतिक्रिया
13
मोहेंजोदडोवर सूर्य तापला! उष्णतेने नवा उच्चांक गाठला, पारा ५० डिग्री सेल्सिअसवर
14
"तिला पाहिल्यावर डोळ्यात पाणी येतं", मनिषा कोईरालाबरोबरच्या ब्रेकअपनंतर दु:खी झाले होते नाना
15
₹१६७ कोटींची सॅलरी! Wipro मध्ये सर्वाधिक वेतन कोणाला मिळालं, रिशद प्रेमजी नाही तर कोण?
16
आयुष्यात पहिलीच कार खरेदी करताय; कशी निवडावी? अनेकांकडून कॉमन चुका हमखास होतात
17
"मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना एक फोन लावला तर सगळं मिटेल"; 'बाळा'च्या आजोबांसोबत आलेल्या व्यक्तीची पोलीस आयुक्तालयातच मुजोरी
18
स्टेडियममध्ये चाहत्यांचा कहर! सेल्फीसाठी जान्हवीच्या दिशेने फेकले मोबाईल, Video व्हायरल
19
वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; सहा महिन्यांच्या बालिकेसह सात मृत्यू, १९ जखमी
20
Tarot Card: येत्या आठवड्यात आव्हानं अनेक आहेत, पण चिंतन करा, चिंता नको; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

कोरोनाचा 'दणदणीत' पराभव करत 'ठणठणीत' होऊन घरी परतल्या 'या' 107 वर्षांच्या आजी, असा साजरा केला होता वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 5:22 PM

कॉर्नेलिया यांना कोरोनाची लागण नेदरलँडमध्येच एका बेटावर पर्यटनासाठी गेल्या असता झाली होती. पर्यंटकांच्या या गटात एकूण 40 जण होते. यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कॉर्नेलिया यांनी न थकता आणि न डगमगता कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देकॉर्नेलिया यांना कोरोनाची लागण नेदरलँडमध्येच एका बेटावर पर्यटनासाठी गेल्या असता झाली होतीयाच गटातील 12 जणांचा झालाये मृत्यूआजारी पडण्याच्या काही दिवसपूर्वीच कॉर्नेलिया यांचा 107वा वाढदिवस होता

अॅम्स्टरडॅम : कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात मृत्यूचे तांडव सुरू आहे. संपूर्ण जगच कोरोनाच्या दहशतीखाली आहे. मात्र, असे असतानाच नेदरलँडच्या एक 107 वर्षांच्या आजी कोरोनाचा दणदणीत पराभव करून ठणठणीत होऊन घरी परतल्या आहेत. त्यांनी घरी गेल्यानंतर गुडघ्यावर बसून इश्वराचे आभार मानले. या आजींचे नाव आहे कॉर्नेलिया रास. 

कॉर्नेलिया यांना कोरोनाची लागण नेदरलँडमध्येच एका बेटावर पर्यटनासाठी गेल्या असता झाली होती. पर्यंटकांच्या या गटात एकूण 40 जण होते. यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, कॉर्नेलिया यांनी न थकता आणि न डगमगता कोरोनावर मात केली आहे.

आता कुठल्याही गोळ्या सुरू नाही -कॉर्नेलिया यांना कोरोना संसर्गाची लक्षणे जाणवू लागताच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावरील उपचार यशस्वी ठरले. त्यांची पुतणी मायके डे ग्रूट सांगतात, की त्या यातून बाहेर येतील याचा आम्हाला विश्वास नव्हता. त्यांच्यत ताप आणि श्वासोश्वासाची लक्षणे दिसायला सुरुवात झाली होती. उपचारावेळी त्या अत्यंत शांत होत्या. त्यांनी स्वतःला पूर्णपणे डॉक्टरांच्या स्वाधिन केले होते. मात्र, आता त्या अगदी ठणठणीत आहेत. त्यांना कुठलेही औषध आता सुरू नाही. त्या आता उन्हात बसत आहेत. कारण त्यांना बालकणीत बसायला आवडते.

कॉर्नेलिया यांना वाढदिवसाच्या दिवशी कुणीही भेटू शकले नाही -न्यूझीलंडमधील एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, आजारी पडण्याच्या काही दिवसपूर्वीच कॉर्नेलिया यांचा 107वा वाढदिवस होता. मात्र, त्यांचा हा वाढदिवस सोशल डिस्टेंसिंगमुळे त्यांना एकट्यालाच साजरा करावा लागला. ग्रूट सांगतात, की लॉकडाऊनमुळे त्यांच्या वाढदिवसाला कुटुंबीयांना जाता आले नाही. मी दर आठवड्याला त्यांच्याकडे जाते आणि तेथे बराच वेळ घालवते. सर्वकाही व्यवस्थित झाल्यानंतर त्यांचा वाढदिवस साजरा करू.

यापूर्वी 104 वर्षांच्या आजींनी दिली होती कोरोनाला मात -कॉर्नेलिया यांच्यापूर्वी 104 वर्षीय अमेरिकेतील लॅपसीज हे कोरोनावर मात करणारे सर्वात वयस्क ठरले होते. त्यांनी दुसरे महायुद्ध आणि 1918 मध्ये आलेल्या स्पॅनिश फ्लूचाही सामना केला आहे. स्पेनिश फ्लूमुळे जवळपास 50 मिलियन लोकांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSwitzerlandस्वित्झर्लंडNew Zealandन्यूझीलंडWomenमहिलाAmericaअमेरिकाCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या