शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

विशेष लेख: इराणहून सुटका, भारतीयांसाठी लांबचा वळसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 06:43 IST

iran israel news: इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला.

इराण आणि इस्त्रायल यांच्यात नव्यानं संघर्ष सुरू झाल्यानंतर त्याचा भारतालाही मोठा फटका बसला. विविध कारणांसाठी त्यातही वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी हजारो भारतीय विद्यार्थी इराणला गेले आहेत. त्यांचं भविष्य आता टांगणीला लागलं आहे. इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांची संख्या या घडीला दहा हजार आहे. या विद्यार्थ्यांना सुरक्षित भारतात परत आणणं हे भारतापुढचं सध्या मुख्य आव्हान आहे. 

इराणमधील काही भारतीय विद्यार्थ्यांना परत मायदेशी आणण्यात आलं आहे, पण तरीही अजून बरेच विद्यार्थी इराणमध्येच अडकून पडले आहेत. इराणमधील बहुतांश विमानतळं सध्या बंद आहेत, त्यामुळे या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर इराणमधून कसं बाहेर काढायचं हा भारतापुढे यक्षप्रश्न आहे. रस्तेमार्ग अजून सुरू आहेत, ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट. त्यामुळे इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना रस्ते मार्गानं पहिल्यांदा अर्मेनियामध्ये आणून मग तिथून हवाईमार्गे भारतात आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. 

पण मग एवढ्या लांबचा मार्ग भारत सरकारनं का निवडला? दुसरा काही मार्ग नव्हता का? - सध्या तरी नाही. इराणच्या सीमेला लागून सात देश आहेत. त्यात पाकिस्तान, अफगानिस्तान, तुर्कमेनिस्तान, अझरबैजान, अर्मेनिया, तुर्की आणि इराक या देशांचा समावेश आहे. याशिवाय इराणची समुद्री सीमा ओमानला लागून आहे; पण इतके सारे देश असतानाही अर्मेनियाच का? - तर त्यामागची मुख्य कारणं नकारात्मक आहेत.इराणशी भारताचे संबंध चांगले असले तरी थेट इराणमधूनच विद्यार्थ्यांना हवाईमार्गे भारतात आणणं धोक्याचं आहे. कारण इराणमधली बहुसंख्य आंतरराष्ट्रीय उड्डाणं सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद आहेत. शिवाय इस्त्रायलचे इराणवर हवाई हल्ले आणि इराणी विमानांना लक्ष्य करणं सुरूच आहे.

आपला शेजारी देश पाकिस्तानमधून विद्यार्थ्यांना भारतात आणणं तुलनेनं सोपं आहे, पण ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताचे पाकिस्तानशी असलेले संबंध खूपच बिघडलेले आहेत. इराक आणि इराणमधून आजही विस्तव जात नाही. त्यामुळे इराकचा मार्ग आपल्यासाठी सुरक्षित नाही. तुर्की हा पर्याय बरा असला तरी इराणपासून रस्तेमार्गानं तिथपर्यंत पोहोचणं फारच लांब आहे. शिवाय ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तुर्कीनं भारतावर टीका केली आणि पाकिस्तानला खुलं समर्थन केलं होतं. त्यामुळे तुर्कीचा मार्गही आपल्यासाठी बंद झाला.

शेवटी पर्याय उरतो तो फक्त अर्मेनियाचा. त्यातल्या त्यात अर्मेनियाची सीमा इराणपासून जवळ आहे. अर्मेनिया राजकीयदृष्ट्या स्थिर देश आहे. भारताचे या देशाशी मित्रत्वाचे संबंध आहेत. दोन्ही देशांत सुरक्षा करारही झालेला आहे. इराणबरोबरही त्यांचे चांगले संबंध आहेत. अर्मेनियाची नॉरदूज बॉर्डर सुरक्षित मानली जाते. तिथलं येरेवन एअरपोर्टही व्यवस्थित सुरू आहे. तिथून विद्यार्थ्यांना हवाईमार्गे भारतात आणणं जास्त सुरक्षित आहे.

इस्त्रायलनं नुकतंच इराणच्या नागरिकांनाही इशारा दिला आहे की इराणची राजधानी तेहरान आणि लष्करीदृष्ट्या संवेदनशील भागात जे नागरिक राहतात, त्यांनी तातडीनं तिथून निघून जावं. कारण त्यांना धोका होऊ शकतो. त्यामुळे भारतीय विद्या‌र्थ्यांच्या सुटकेसाठी सध्या अर्मेनिया हाच ‘खुष्की’चा मार्ग  आहे.

टॅग्स :warयुद्धIranइराणIsraelइस्रायल