शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

पैसे भरा, सोप्या पद्धतीनं NA सर्टिफिकेट घेऊन जा; बाळासाहेब थोरात यांची महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 1:31 PM

'आम्ही स्टॅम्प ड्युटीचा निर्णय एका बैठकीत घेतला, याचा अनेकांना फायदा होत आहे.'

मुंबई:लोकमततर्फे आज 'लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह' 'महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप' या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थारोत यांनी महसूल संदर्भातील विविध आणि महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. 

आपल्या संभाषणाच्या सुरुवातीला त्यांनी या कार्यक्रमासाठी लोकमतेच आभार मानले. ते म्हणाले की, 'महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही काय-काय केलं, हे सांगण्याची संधी आम्हाला या निमित्ताने मिळाली. कोरोना संकटामुळे मागील दोन वर्षे कठीण गेले. सर्वकाही ठप्प झाले होते, पण आता हळु-हळू सुरळीत होत आहे. मागील दोन वर्षात खूप अडचणी आल्या, पण राज्याच्या विकासाचे काम थांबले नाही. कोरोना संकटात मुख्यमंत्री जातीने लक्ष घालून होते. त्यांच्या कामाचे देशाने कौतुक केले आहे.'

आम्हाला वजा केले तर काहीच होणार नाहीयावेळी बाळासाहेब थोरात यांनी मिश्कील टिपण्णी केली. ते म्हणाले की, 'काहीजण म्हणत होते या कार्यक्रमात महसूल मंत्र्याचे काय काम? पण, विजय दर्डा यांना माहितीये, महसूलाशिवाय काहीच होत नाही. तुम्ही पुल पाहिला, पण त्या पुलाखालची जमीन पाहिलीच नाही. जमिनीचे अधिग्रहन आणि इतर सर्व बाबी महसूल खात्यातच येतात. आम्हाला वजा केले तर काहीच होणार नाही, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली.

स्टॅम्प ड्युटीचा निर्णय एका बैठकीत घेतला'आमच्या सरकारने केलेले राज्यातील काम पाहिले तर पुढील काही वर्षात खूप मोठे बदल होणार. नवीन विमानतळ, कोस्टल वे, ट्रांस हार्बर, समृद्धी महामार्ग यांसारखे मोठे प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होणार आहेत. कमी काळात किती चांगला काम करता येत, हे समृद्धी महामार्ग पाहून कळतं. मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला स्टॅम्प ड्युटीचा निर्णय आम्ही एका बैठकीत घेतला. कोरोना संकटातून बाहेर काढण्यासाठी हा निर्णय घेण्याच बैठकीत ठरलं. या निर्णयाचा अनेकांना फायदा झाला, सरकारचे उत्पनही वाढले,' अशी माहिती त्यांनी दिली.

NA काढण्याची प्रक्रिया सोपी केलीयावेळी थोरात यांनी NA(Non Agriculture )वरही महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, 'पारदर्शकता आणण्यासाठी आम्ही महसूल विभागात खूप बदल केले. सर्वात मोठा बदल म्हणजे NAचा. मी 2014 सालापर्यंत बदल केले, त्यानंतरही प्रयत्न झाले. पण, आता आम्ही यात अजून बदल करत आहोत. आता लोकांना NA साठी वाट पाहण्याची गरज नाही. पैसे भरुन सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे NA सर्टीफीकेट घेऊन जाऊ शकता. याचा ड्राफ्ट अंतिम टप्प्यात आहे, लवकरच याबाबत निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

सर्व कागदपत्र ऑनलाइन उपलब्धते पुढ म्हणाले की, 'आम्ही सातबाराचा फ्रॉर्मेट बदलला, नवीन सातबारा आणला. आमच्या सरकारने सातबारा मोफत वाटलेत. खात्यांच्या उताराही आता ऑनलाइन मिळतोय. 1 ऑगस्टपासून 1 कोटी 25 लाख सातबारा डाउनलोड झालेत. फेरफार आणि खाते उतारेही ऑनलाइन घेतले जात आहेत. शहरासाठी महत्वाचा असणारे, प्रॉपर्टी कार्डवर आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत. पुढच्या महिन्यात याची सुरुवात होईल. मुद्रांक शुल्क आणि मोजणीचे कामही लवकरच निकाली लागणार आहे. याशिवाय रेरा रजिस्ट्रेशनही आता ऑनलाइन होईल. यासाठी तुम्हाला कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही. याशिवाय, शेतकऱ्यांना पीक मोजणी त्यांच्या मोबाईलवरुन करता येणार आहे. यावर काम सुरू आहे आणि लवकरच निर्णय होईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातLokmatलोकमतMumbaiमुंबई