शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

विश्व हॉकी लीग फायनल्स; भारताच्या अंतिम संघाची घोषणा, सरदार सिंग संघाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:42 AM

पुढच्या महिन्यात भुवनेश्वरमध्ये होणाºया हॉकी विश्व लीग फायनल्ससाठी भारताच्या १८ सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली.

नवी दिल्ली : पुढच्या महिन्यात भुवनेश्वरमध्ये होणाºया हॉकी विश्व लीग फायनल्ससाठी भारताच्या १८ सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली. त्यातून अनुभवी मिडफिल्डर सरदार सिंगला वगळण्यात आले आहे. त्याचवेळी रूपिंदर सिंग आणि वीरेंद्र लाकडा हे पुनरागमन करत आहेत.या वर्षी खेलरत्न पुरस्कार मिळवणाºया सरदारला वगळले जाणे हे धक्कादायक आहे. गेल्या महिन्यात आशिया चषक विजेत्या भारतीय संघाचा तो सदस्य होता. माजी कर्णधाराच्या करिअरचा अंत म्हणून याकडे पाहिले जात आहे. आशिया चषकात सरदारने मिडफिल्डमध्ये प्लेमेकरची भूमिका बजावण्याऐवजी युवा कर्णधार मनप्रीत सिंगसोबत डिफेंडर म्हणून खेळ केला होता. हॉकी विश्व लीगमधून त्याला बाहेर करणे म्हणजे तो नवीन प्रशिक्षक शोर्ड मरिन यांच्या रणनीतीत फिट बसत नाही. मरिन यांनी आशिया चषकाच्या आधी रोलेंट ओल्टमन्स यांना बाहेर केल्यानंतर संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.रूपिंदरने भारतासाठी या आधीचा सामना हॉकी विश्व लीग सेमीफायनल्समध्ये युरोप दौºयात खेळला होता, तर लाकडा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा भाग होता.हॉकी इंडियाच्या निवडकर्त्यांनी मनप्रीत सिंग याला कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. तर चिंगलेनसाना सिंग उपकर्णधार असेल. पी.आर.श्रीजेश अजून पूर्णपणे फिट नसल्याने गोलरक्षकाची जबाबदारी आकाश चिकटे आणि सूरज करकेरावर असेल. मिडफिल्डमध्ये एस.के.उथप्पा, कोथाजित सिंह आणि सुमितसोबत मनप्रीत आणि चिंगलेनसाना असेल.ज्युनियर विश्वचषकाचे स्टार हरमनप्रीत सिंग, वरुण आणि दिप्सन तिर्की यांनी युरोप आणि आशिया चषकात केलेल्या दमदार कामगिरीचे फळ मिळाले आहे. ओडिशाच्या अमित रोहिदास याने पुनरागमन केले. भारताकडे एस.व्ही. सुनील, आकाशदीप सिंग, गुरजंत सिंग यांच्यासारखे अनुभवी फॉरवर्ड आहे. ललित उपाध्याय आणि मनदीप सिंग यांनी आशिया चषकातून बाहेर राहिल्यानंतर संघात पुनरागमन केले.कारकिर्दीला नव्याने सुरूवात करणार - रुपिंदरगेल्या सहा महिन्यांपासून हॉकी संघातून बाहेर असलेल्या रुपिंदरपाल याला हॉकी विश्वलीग फायनल्ससाठी संघात स्थान मिळाले आहे. पुुनरागमनाच्या या संधी आपण सोने करु तसेच कारकिर्दीलाच नव्याने सुरूवात करण्याचा निर्धार रुपिंदरपाल याने व्यक्त केला.रुपिंदरने सांगितले की,‘ मला शंका होती की मी पुनरागमन करु शकतो की नाही. मी त्यासाठी खुप मेहनत घेतली. माझे पहिले लक्ष्य होते. आशिया कपमधून पुनरागमन करण्याचे मात्र मी त्यासाठी घाई केली नाही. मी दिल्ली आणि बंगळुरूच्या साई सेंटरमध्ये मानसीक तणावातून बाहेर पडलो.‘हॉकी संघ पुढीलप्रमाणेगोलकिपर - आकाश चिकटे, सूरज करकेरा.डिफेंडर - हरमनप्रीत सिंग, अमित रोहिदास, दिप्सन तिर्की, वरुण कुमार, रूपिंदरपाल सिंग, वीरेंद्र लाकडा.मिडफिल्डर - मनप्रीत सिंग (कर्णधार), चिंगलेनसाना सिंग, एस.के.उथप्पा, सुमित, कोथाजित सिंग.फॉरवर्ड - एस.व्ही.सुनील, आकाशदीप सिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, गुरजंत सिंग.भुवनेश्वरमध्ये पुनरागमन आनंददायी - वीरेंद्र लाकडासुमारे वर्षभरानंतर भारतीय संघात परतणाºया अनुभवी डिफेंडर वीरेंद्र लाकडा याच्या पुनरागमनचा आनंद दुप्पट झाला आहे. कारण तो त्याच्या होमटाऊनमध्ये म्हणजेच भुवनेश्वरमध्येच भारतीय संघात पुरागमन करत आहे. ही बाब आपल्यासाठी ‘सोने पे सुहागा’ अशीच असल्याचे लाकडा याने सांगितले. पुनरागमनाच्या बाबतीत लाकडा याने जर्मन हॉकीपटू मोरित्ज फुएर्स्ते याच्याकडून प्रेरणा घेतली. लाकडा म्हणाला की, ‘मोरित्जच्या करिअरमध्ये फिटनेसच्या समस्या आल्या होत्या. त्याने पुन्हा दमदार पुनरागमन केले होते. मी त्यापासूनच प्रेरणा घेतली.’

टॅग्स :HockeyहॉकीIndiaभारत