शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त होणार ‘भारताची भिंत’; पॅरिस ऑलिम्पिक : हॉकी गोलरक्षक श्रीजेशने केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 05:33 IST

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्यपदकाच्या रुपाने ४१ वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकले होते.

पॅरिस : आगामी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा भारतीय हॉकीप्रेमींसाठी भावनिक ठरणार आहे. ‘यंदाची ऑलिम्पिक माझी अखेरची स्पर्धा ठरणार असून, या स्पर्धेनंतर मी निवृत्त होणार आहे,’ अशी घोषणा भारताचा दिग्गज गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने केली. भारताकडून ३२८ सामने खेळलेल्या श्रीजेशची ही चौथी ऑलिम्पिक स्पर्धा ठरेल. त्याचप्रमाणे, श्रीजेशने अनेक राष्ट्रकुल, आशियाई क्रीडा स्पर्धांसह अनेक विश्वचषक स्पर्धांतही आपली छाप पाडली आहे.

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करताना कांस्यपदकाच्या रुपाने ४१ वर्षांनी ऑलिम्पिक पदक जिंकले होते. यामध्ये श्रीजेशची भूमिका मोलाची ठरली होती. हॉकी इंडियानेही सोमवारी श्रीजेशला त्याच्या शानदार कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे हॉकी इंडियाने भारतीय संघासाठी ‘विन इट फॉर श्रीजेश’ (श्रीजेशसाठी जिंका) अशी मोहीमही सुरू केली आहे. यामुळे भारतीय खेळाडूंना पदक जिंकण्याची प्रेरणा मिळेल, असे हॉकी इंडियाने म्हटले.

श्रीजेशची कामगिरी  २०१० मध्ये श्रीजेशने भारताकडून पदार्पण केले.  २०१४ आशियाई स्पर्धेत सुवर्ण, २०१८ आशियाई स्पर्धेत कांस्य विजेत्या भारतीय संघाचा सदस्य.  २०१८ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी संयुक्त विजेता, २०१९ एफआयएच पुरुष सिरीज फायनल सुवर्णपदक आणि २०२२ राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या भारतीय संघाचा सदस्य.  २०२१-२२ एफआयएच हॉकी प्रो-लीग स्पर्धेत भारताला तिसऱ्या स्थानी पोहोचवण्यात श्रीजेशची निर्णायक भूमिका.

पुरस्कार  २०२१ साली मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित.  २०२१ साली वर्ल्ड गेम्स ॲथलिट ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा केवळ दुसरा भारतीय ठरला.  २०२१ आणि २०२२ अशी सलग दोन वर्षे एफआयएच वर्षातील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार पटकावला.

 मला माझ्या कारकिर्दीवर खूप गर्व आहे. माझा  प्रवास विशेष ठरला. कुटुंबीय, सहकारी, प्रशिक्षक, प्रशंसक आणि हॉकी इंडियाकडून मिळालेले प्रेम आणि समर्थनासाठी आभारी राहीन. - पी. आर. श्रीजेश

टॅग्स :Hockeyहॉकी