शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

Tokyo Olympics: खेळाडू, प्रशिक्षकांसोबतच सर्वजण यशाचे भागीदार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2021 5:22 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला टोकियोला जाण्यापूर्वी प्रोत्साहित केले. तसेच पदक जिंकल्यावर लगेच त्यांचा फोन आला यानेदेखील मन भरून आले. त्यापेक्षा कोणतीही मोठी प्रेरणा असू शकत नाही.

- मनप्रीत सिंहआम्ही गेल्या २४ तासांमध्ये भावनांच्या झोपाळ्यावर होतो. पुरुष हॉकी संघाने कांस्य पदक पटकावले आणि महिला हॉकी संघाने चौथे स्थान मिळवले. त्यामुळे संपूर्ण देशात हॉकीबाबत आनंददायी वातावरण निर्माण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला टोकियोला जाण्यापूर्वी प्रोत्साहित केले. तसेच पदक जिंकल्यावर लगेच त्यांचा फोन आला यानेदेखील मन भरून आले. त्यापेक्षा कोणतीही मोठी प्रेरणा असू शकत नाही. ऑलिम्पिक पदक जिंकण्यापेक्षा कोणतेही उत्तम बक्षीस असू शकत नाही. खेळाडू, प्रशिक्षक, स्टाफ यांची मेहनत होती.या प्रवासात अनेकांनी सहकार्य केले. त्यात भारत सरकार, ओडिशा सरकार, हॉकी इंडियाचे नेतृत्वाने एकत्रितपणे तयारी करून आम्हाला ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सर्वोत्तम दिले. आम्ही ४१ वर्षांनी पदक मिळवलेआता मागे वळून बघायला हरकत नाही. याची सुरुवात मार्च २०२० मध्ये झाली क्रीडा मंत्रालयाने आम्हाला १० मार्चलाच लॉकडाऊनसाठी तयार रहायला सांगितले होते. हे कठीण होते. पण महामारी पसरल्यानंतर आम्हाला या निर्णयाचे महत्त्व कळले. आम्ही साईच्या बंगळुरूतील केंद्रात होतो. बाहेरच्या जगापासून अलिप्त होतो. या काळात आमच्यात सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले. त्याचा परिणाम आमची ताकद वाढली.जेव्हा आम्ही प्रशिक्षण पुन्हा सुरू केले. तेव्हा देखभाल करणारे कर्मचारी नसल्याने टर्फ निसरडा झाला होता. आमच्याकडे स्टाफ देण्यास अधिकाऱ्यांनी परवानगी लवकर दिली नाही. नंतर वचनबद्ध कर्मचारी मिळाले. त्यांनी आम्हाला सराव करण्यासाठी टर्फ स्वच्छ केला. आम्ही पुन्हा परतलो. कोविड प्रोटोकॉलमुळे दोन आठवडे विलगीकरणात घालवावे लागले. आम्हाला जे हवे होते ते सर्व काही आमच्या रूममध्ये मिळत होते. हॉकी इंडियाने सरावसाठी पुरेशी व्यवस्था करून दिली. ऑलिम्पिकच्या आधी आम्ही ज्युनियर खेळाडूंसह सराव केला. साईने आम्हाला गरज पडल्यास रुग्णालयात दाखल करण्यासाठी आधीच तयारी करून ठ‌ेवली होती. याचे महत्त्व तेव्हा लक्षात आले जेव्हा सुरेंद्र कुमारला पोस्ट कोविडमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. आम्हाला माहित होते की तो लवकर परत येणार आहे. डिसेंबर २०१९ मध्ये संघाचा समावेश टॉप्समध्ये करण्यात आला. या यशाने खेळाडू आणि प्रशिक्षक प्रकाश झोतात आले मात्र बंगळुरूतील नॅशनल सेंटर ऑफ एक्सेलन्सच्या स्टाफचे देखील आभार मानायला हवे. ही जागा फक्त राष्ट्रीय सराव शिबिर नसून आमच्यासाठी एक आध्यात्मिक घर आहे. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021