भारताने दक्षिण कोरियाला ३-२ ने नमवले; गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 05:59 IST2023-08-08T05:59:35+5:302023-08-08T05:59:45+5:30
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी

भारताने दक्षिण कोरियाला ३-२ ने नमवले; गुणतालिकेत पुन्हा अव्वल स्थानी
चेन्नई : चुरशीच्या झालेल्या सामन्यात भारतीय पुरुष संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत आपला तिसरा विजय मिळवताना दक्षिण कोरियाला ३-२ असे नमवले. त्यासह भारताने गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावताना मलेशियाला दुसऱ्या स्थानी खेचले.
आक्रमक सुरुवात केलेल्या भारताने सहाव्याच मिनिटाला आघाडी घेतली. निलकांत शर्माने अप्रतिम मैदानी गोल करत भारताला आघाडीवर नेले. त्यानंतर किम सनघ्युन याने १२व्या मिनिटाला मैदानी गोल करत कोरियाला बरोबरी साधून दिली. पहिल्या क्वाॅर्टरमध्ये बरोबरी कायम राहिल्यानंतर दुसऱ्या क्वाॅर्टरमध्ये २३व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नवर गोल करत भारताला आघाडीवर नेले. तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये ३३व्या मिनिटाला मनदीप सिंगने गोल करत भारताला ३-१ अशा आघाडीवर नेले.
याआधी झालेल्या लढतीत पाकिस्तानने चीनला २-१ असे नमवले. तसेच, मलेशियाने जपानचा ३-१ असा धुव्वा उडविला.