भारताचा न्यूझीलंडवर विजय; हॉकी मालिकेत आघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 02:09 IST2018-07-22T02:08:39+5:302018-07-22T02:09:13+5:30

सुनीलचे दोन गोल, ३-१ भारत विजयी

India beat New Zealand The lead in the hockey series | भारताचा न्यूझीलंडवर विजय; हॉकी मालिकेत आघाडी

भारताचा न्यूझीलंडवर विजय; हॉकी मालिकेत आघाडी

बंगळुरू : भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडवर सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवत मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे. एस.व्ही. सुनीलच्या गोलच्या जोरावर या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ३ -१ ने पराभूत केले.
भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ केला. स्ट्रायकर एस.व्ही. सुनील याने पहिल्या मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यूझीलंडचा गोलकिपर रिचर्ड जायस याने त्याला यश मिळू दिले नाही.
भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि एकही गोल केला नाही.
दुसºया क्वार्टरमध्ये भारताला १८ व्या मिनिटाला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले आणि तिसºयावर रूपिंदर पाल सिंह याने गोल केला.
यानंतर एका मिनिटातच सुनीलने आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर मिळवला. मात्र गोल होऊ शकला नाही. न्यूझीलंडने २४ व्या मिनिटाला स्टिफन जेनेसच्या गोलच्या जोरावर १ -१ अशी बरोबरी साधली.
तीन मिनिटांनी सिमरनजीत सिंह याच्या पासवर सुनील याने दुसरा गोल केला. आणि भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिला. तिसºया क्वार्टरपर्यंत एकही गोल होऊ शकला नाही. भारताने अखेरच्या क्वार्टरमध्ये तिसरा गोल केला. सुनीलच्या पासवर मनदीप याने ५६ व्या मिनिटाला चेंडू गोलपोस्टमध्ये टाकला.

Web Title: India beat New Zealand The lead in the hockey series