ओमान: भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांत होणारी आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. दीड तासाहून अधिक काळ प्रतीक्षा पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. मात्र, मनप्रीत सिंगने मोठ्या चतुराईने जेतेपदाचा चषक आपल्याकडेच राहिल याची काळजी घेतली. त्याच्या या स्मार्ट खेळीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
भारत-पाकिस्तानला संयुक्त जेतेपद, पण मनप्रीतने राखला चषक आपल्याकडेच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 08:47 IST
भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांत होणारी आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली.
भारत-पाकिस्तानला संयुक्त जेतेपद, पण मनप्रीतने राखला चषक आपल्याकडेच
ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तान यांनी प्रत्येकी तीनवेळा आशियाई अजिंक्यपद जिंकण्याचा मान पटकावला आहे.