शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

‘सावत्र’ महिला संघाकडून कसा होईल ‘चक दे’सारखा चमत्कार?

By स्वदेश घाणेकर | Published: July 21, 2018 4:02 AM

भारतीय महिला हॉकी संघाचा वैभवशाली इतिहास लंडनच्या एका संग्रहालयामध्ये छायाचित्रांच्या स्वरूपात मांडण्यात आलाय म्हणे.

मुंबई : भारतीय महिला हॉकी संघाचा वैभवशाली इतिहास लंडनच्या एका संग्रहालयामध्ये छायाचित्रांच्या स्वरूपात मांडण्यात आलाय म्हणे. निमित्त आहे ते, शनिवारपासून सुरू होत असलेल्या महिला विश्वचषक हॉकी स्पर्धेचे. या महासंग्रामात उतरण्यापूर्वी भारतीय महिला या संग्रहालयाला नक्की भेट देतील. आता, भारतीय महिलांच्या हॉकीतील कामगिरीला वैभवशाली म्हणावं की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जाऊ शकते.१९७४च्या पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत चौथे स्थान ही आपली आत्तापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. १९८२मध्ये आशियाई, २००२मध्ये राष्ट्रकुल, २००४मधील आशिया चषक, २०१६मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील जेतेपद हा महिला संघाचा इतिहास. २०१७मध्ये म्हणजेच १३ वर्षांनी या महिलांनी आशिया चषक पुन्हा उंचावला. यापलीकडे महिला हॉकीपटूंकडे सांगण्यासारखी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे त्यांचा संघर्ष. तो तेव्हाही होता आणि आत्ताही सुरूच आहे. त्या संघर्षाची व्याप्ती आकुंचन पावतेय, पण अगदीच संथ गतीने.भारताच्या महिला हॉकी संघाकडे नेहमी दुय्यम नजरेने पाहिले गेले. प्रशिक्षकांची निवड, मूलभूत सोयी-सुविधा, सराव स्पर्धा, परदेश दौरे यासाठी त्यांना नेहमी झगडावे लागले. आज परिस्थिती तशी नाही. पण ती पूर्वीपेक्षा फार चांगली आहे असेही नाही. त्यांच्या वाट्याला कायमच सापत्न वागणूक आली आहे. अगदी २०१५पर्यंत भारतीय महिला संघाला कुणी वाली आहे का, हा प्रश्न सतत मनात येत होता. १९८०नंतर भारतीय हॉकी संघाने प्रथमच आॅलिम्पिक स्पर्धेची पात्रता मिळवली. ३६ वर्षांनी भारतीय संघ दुसऱ्यांदा आॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला. महिला हॉकीसाठी ती नवी पहाटच होती. पण म्हणून त्यांना लगेच भारतीय पुरुष हॉकी संघाच्या समांतर बसविले गेले नाही. ना प्रशिक्षक निवड प्रक्रियेत मत मांडण्याचे अधिकार, ना परदेश दौरा आयोजित करण्याचा मागणी अधिकार.. हॉकी इंडियाने दिलेल्या प्रशिक्षकासोबत सराव करायचा आणि ते ठरवतील त्या दौºयावर जायचे, हे चालत आले आहे. पुरुष संघाचे प्रशिक्षक वर्षावर्षाला बदलल्याची उदाहरणे आहेत. पण तशी तत्परता, सजगता महिला संघाचा प्रशिक्षक निवडताना दाखविली जात नाही. आताही तेच झाले आहे.रोलँट ओल्टमन्स यांची उचलबांगडी झाली व महिला संघाचे प्रशिक्षक शोर्ड मरिन्झ यांना पुरुष संघ सांभाळण्यास सांगितले. ज्युनियर संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांची महिला संघाच्या उच्च कामगिरी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. मरिन्झ यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष संघाला साजेशी कामगिरी करता न आल्याने पुन्हा खांदेपालट. मरिन्झ निष्क्रिय होते; मग महिला संघाच्या प्रशिक्षकांची जबाबदारी त्यांना पुन्हा का दिली? पुरुष संघाच्या कामगिरीतून मिळणारा महसूल अधिक म्हणून त्यांना रॉयल ट्रिटमेंट अन् महिला संघाला अगदी उलट वागणूक.रिओ आॅलिम्पिकनंतर परिस्थितीत थोडाफार बदल झाला. त्याचा सकारात्मक परिणाम २०१७च्या आशियाई स्पर्धेत दिसला. १३ वर्षांनी महिलांनी ही स्पर्धा जिंकली. २०१८च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रकुल स्पर्धेत महिला संघ पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला.>विश्वचषक दिवास्वप्न...भारताने साखळी फेरी पार केली, तरी ते मोठे यश ठरू शकते. जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानावर असलेल्या भारताला ‘ब’ गटात इंग्लंड (२) व अमेरिका (७) याचे आव्हान आहे. या स्पर्धेत भारताच्या १८ पैकी १६ खेळाडू प्रथमच विश्वचषक स्पर्धेत खेळतील. त्यामुळे विश्वचषक जिंकण्याचे दिवास्वप्नच भारत पाहत असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

टॅग्स :Hockeyहॉकी