शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Hockey World Cup 2018 : थरारक सामन्यात अर्जेंटिनाचा विजय, स्पेनवर 4-3 अशी मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 19:37 IST

Hockey World Cup 2018: अर्जेंटिना आणि स्पेन हे हॉकीतील दोन चिवट संघ गुरुवारी हॉकी विश्वचषक स्पर्धेत समोरासमोर आले होते.

ठळक मुद्देअर्जेंटिनाची विजयी सलामी, स्पेनवर मातऑगस्टीन मॅझील्लीला सामनावीराचा पुरस्कारजय-पराजयाची आकडेवारी 3-3 अशा बरोबरीत

भुवनेश्वर, हॉकी विश्वचषक स्पर्धा : अर्जेंटिना आणि स्पेन हे हॉकीतील दोन चिवट संघ गुरुवारी हॉकी विश्वचषक स्पर्धेत समोरासमोर आले होते. दोन्ही संघांत अपेक्षेप्रमाणे चुरशीचा खेळ झाला. अर्जेंटिनाच्या बचावाला स्पेनकडून चोख प्रत्युत्तर मिळाले, परंतु अर्जेंटिनाने अनुभवाच्या जोरावर 'A' गटातील पहिल्याच सामन्या 4-3 अशी बाजी मारली. अर्जेंटिनाच्या ऑगस्टीन मॅझील्लीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. अर्जेंटिना आणि स्पेन यांच्यातील जय-पराजयाच्या आकडेवारीत स्पेन 3-2 असा आघाडीवर होता. उभय संघांमध्ये झालेल्या सात सामन्यांत दोन सामने अनिर्णीत सुटले. त्यामुळे याही सामन्यात स्पेनचे पारडे जड मानले जात होते. मात्र, मागील विश्वचषक स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानणाऱ्या अर्जेंटिनाने सरस खेळ केला. सामन्यात पहिल्या पंधरा मिनिटांत पाच गोल झाले. त्यात अर्जेंटिनाने तीन, तर स्पेनने दोन गोल केले. तिसऱ्याच मिनिटाला एन्रीक गोंझालेज डी कॅस्टेजोन याने स्पेनला आघाडी मिळवून दिली, परंतु पुढच्याच मिनिटाला अर्जेंटिनाकडून सुरेख मैदानी गोल झाला. ऑगस्टीन मॅझील्लीने हा गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. पहिल्या सत्रातील 14 व्या मिनिटाला पेरे रोमेऊने स्पेनला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अर्जेंटिनाने खेळ उंचावला आणि मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर संधी साधली. ऑगस्टीन व गोंझालो पेईलट यांनी 15 व्या मिनिटात लागोपाठ मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अर्जेंटिनाला 3-2 असे आघाडीवर आणले.दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी सावध खेळ केला. 35 व्या मिनिटाला व्हिसेंस रुईजने स्पेनसाठी बरोबरीचा गोल केला. मात्र, 49 व्या मिनिटाला गोंझालोने अर्जेंटिनासाठी केलेला गोल विजयी ठरला. अर्जेंटिनाने शेवटच्या दहा मिनिटांत बचावात्मक खेळ करून सामना जिंकला. 

टॅग्स :Hockey World Cup 2018हॉकी विश्वचषक स्पर्धाArgentinaअर्जेंटिना