हॉकी मालिका, भारताची न्यूझीलंडवर ४-२ गोलने मात

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 02:15 AM2018-07-20T02:15:12+5:302018-07-20T02:15:23+5:30

भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघावर ४-२ गोलने दणदणीत विजय मिळवला.

Hockey Series, India beat New Zealand 4-2 | हॉकी मालिका, भारताची न्यूझीलंडवर ४-२ गोलने मात

हॉकी मालिका, भारताची न्यूझीलंडवर ४-२ गोलने मात

Next

बंगळुरू : भारतीय पुरुष हॉकी संघाने गुरुवारी तीन सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीत न्यूझीलंड संघावर ४-२ गोलने दणदणीत विजय मिळवला.
भारतासाठी रूपिंदरपाल सिंग याने दुसऱ्या आणि ३४ व्या मिनिटाला, असे दोन गोल केले. मनदीपसिंहने १५ व्या आणि हरमनप्रीतसिंह याने ३८ व्या मिनिटाला गोल केले. न्यूझीलंडकडून स्टीफन जेनेस याने २६ व्या आणि ५५ व्या मिनिटाला गोल केला.
भारताला सुरुवातीच्या मिनिटालाच पेनल्टी कॉर्नर मिळाला. रूपिंदरने या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत भारताला आघाडी मिळवून दिली. गोल्डकोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेनंतर संघात पुनरागमन करणाºया रूपिंदरचा फटका न्यूझीलंडचा गोलरक्षक रिचर्ड जायस रोखू शकला नाही.
न्यूझीलंडला सातव्या मिनिटाला बरोबरीची संधी मिळाली; परंतु भारतीय गोलरक्षक कृष्ण पाठकने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. त्यानंतर मनप्रीतसिंहच्या क्रॉसवर मनदीपने १५ व्या मिनिटाला गोल करीत भारताची आघाडी दुप्पट केली. दुसºया क्वॉर्टरमध्ये न्यूझीलंडने डिफेन्स मजबूत केला. भारताला २२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर मात्र गोल होऊ शकला नाही.
न्यूझीलंडसाठी २६ व्या मिनिटाला जेनेसने पहिला गोल केला. पूर्वार्धानंतर भारताने आक्रमण आणखी धारदार केले. फॉरवर्ड एस.व्ही. सुनीलने भारताला तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला आणि त्याचे रूपिंदरने गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर ३८ व्या मिनिटाला सुनील भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवून दिला. त्यावर हरमनप्रीतने भारताचा चौथा गोल नोंदवला.
अखेरच्या क्वॉर्टरमध्ये न्यूझीलंड संघाने सातत्याने हल्ले करत भारताला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला व जेनेसने दुसरा गोल केला. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु त्यावर वूडस् गोल करू शकला नाही. त्यानंतर पुन्हा किवी संघाला पेनल्टी कॉर्नर मिळाला; परंतु सूरज करकेरा याने त्यांचे गोल करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरवले. (वृत्तसंस्था)

Web Title: Hockey Series, India beat New Zealand 4-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी