हॉकी सराव सामना: भारतीय महिला पराभूत, लेडीज डेन बोश संघाकडून मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 03:48 AM2017-09-10T03:48:55+5:302017-09-10T03:49:16+5:30

युरोप दौ-यावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला स्थानिक लेडीज डेन बोश संघाकडून ०-१ गोलने पराभव पत्करावा लागला.

Hockey hockey match: Indian women lose, women lose by Dan Bosch | हॉकी सराव सामना: भारतीय महिला पराभूत, लेडीज डेन बोश संघाकडून मात

हॉकी सराव सामना: भारतीय महिला पराभूत, लेडीज डेन बोश संघाकडून मात

Next

डेन बोश (नेदरलॅँड) : युरोप दौ-यावर असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला स्थानिक लेडीज डेन बोश संघाकडून ०-१ गोलने पराभव पत्करावा लागला.
डेन बोश संघातील ९ जणी नेदरलँडच्या राष्टÑीय संघातील नियमित खेळाडू आहेत. स्थानिक संघाला तिसºयाच मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु, भारताचे गोलरक्षक रजनी एटीमार्पूने उत्कृष्ट गोलरक्षण करून डेन बोश संघाच्या गोल करण्याच्या इराद्यावर पाणी पाडले. नंतर डेन बोशच्या आघाडीच्या फळीने रचलेल्या चाली भारतीय बचाव फळीने अयशस्वी केल्या. दुसºया क्वॉर्टरपर्यंत दोन्ही संघ गोल करू शकले नाहीत.
भारताच्या वंदना कटारिया आणि कर्णधार राणीने डेन बोश संघाविरुद्ध गोल करण्यासाठी दोन चांगल्या चाली रचल्या; पण त्यांना गोल करण्यात यश आले नाही. नंतर ३३व्या मिनिटाला डेन बोश संघाच्या हुल्सकेनने भारताची गोलरक्षक सविताला चकवून आपल्या संघाचा दुसरा गोल केला. दुसºया क्वॉर्टरनंतर भारतीय संघाने रजनीऐवजी गोलरक्षणासाठी मैदानात उतरविलेल्या सविताला तो गोल आडविण्यात यश नाही आले. त्यानंतर मात्र भारतीय संघाच्या बचाव फळीने डोन बोश संघाच्या आघाडीच्या फळीला एकही गोल करण्याची संधी दिली नाही.

Web Title: Hockey hockey match: Indian women lose, women lose by Dan Bosch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.