चौरंगी हॉकी मालिका : भारताने केली पराभवाची परतफेड ,बेल्जियमवर ५-४ ने रोमहर्षक विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:03 IST2018-01-26T01:03:44+5:302018-01-26T01:03:52+5:30
भारतीय हॉकी संघाने गुरुवारी शानदार कामगिरीच्या बळावर चौरंगी हॉकी मालिकेतील सामन्यात बेल्जियमवर ५-४ असा रोमहर्षक विजय नोंदवत या आधी झालेल्या पराभवाचीदेखील परतफेड केली.

चौरंगी हॉकी मालिका : भारताने केली पराभवाची परतफेड ,बेल्जियमवर ५-४ ने रोमहर्षक विजय
हॅमिल्टन: भारतीय हॉकी संघाने गुरुवारी शानदार कामगिरीच्या बळावर चौरंगी हॉकी मालिकेतील सामन्यात बेल्जियमवर ५-४ असा रोमहर्षक विजय नोंदवत या आधी झालेल्या पराभवाचीदेखील परतफेड केली.
भारताला याआधी जागतिक क्रमवारीत तिस-या स्थानावर असलेल्या बेल्जियमकडून १-२ असा पराभवाचा धक्का बसला होता. भारतासाठी रूपिंदरपालसिंग (चौथ्या आणि ४२ व्या) दोन तसेच हरमनप्रीत (४६), ललित उपाध्याय (५३) तसेच दिलप्रीतसिंग (५९ वा मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. बेल्जियमकडून जॉन डोमेन (१७ व्या), अलेक्झांडर हेंड्रिक्स (४५ व्या) आणि टॉम बून (५६) यांना गोल नोंदविण्यात यश आले.
भारताचा पहिला गोल पेनल्टी कॉर्नरवर रूपिंदरने केला. दुसºया क्वार्टरमध्ये युरोपियन संघाने सर्व शक्ती पणाला लावली. जॉनने गोल करीत बरोबरी साधून दिली. तिसºया क्वार्टरमध्ये उभय संघ आक्रमक खेळले. बेल्जियमने ३७ व्या मिनिटाला गोल करून आघाडी घेतली. (वृत्तसंस्था)
काही मिनिटानंतर रूपिंदरने गोल नोंदवून २-२ अशी आघाडी घेतली. हेंड्रिक्सने पुन्हा रिबाऊनडवर गोल नोंदवित ३-२ अशी आघाडी मिळवून दिली.अखेरच्या क्वार्टरमध्ये हरमनप्रीतने रिबाऊंडवर गोल नोंदवून ३-३ बरोबरी साधण्यात यश मिळविले.
भारताला पुढच्या मिनिटाला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण तो व्यर्थ गेला. दरम्यान विवेकप्रसाद याने बेल्जियमची ‘डी’ भेदून चेंडू ललितकडे सोपविला. त्यावर ललितने अलगद गोल नोंदविला. सामना संपायला काही सेकंद उरले असताना रमणदीपच्या पासवर दिलप्रीतने विजयी गोल केला. भारतीय संघ २७ जानेवारी रोजी जपानविरुद्ध खेळणार आहे.