चौरंगी हॉकी मालिका : भारताची यजमान न्यूझीलंडवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:29 IST2018-01-25T00:29:15+5:302018-01-25T00:29:34+5:30
भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी चार देशांच्या हॉकी स्पर्धेत यजमान न्यूझीलंडला बुधवारी संघर्षपूर्ण लढतीत ३-२ ने नमविले. ललित उपाध्याय, हरजितसिंग आणि रुपिंदरपालसिंग यांनी गोल नोंदविले. डॅनियल हॅरिस आणि केन रसेल यांनी प्रतिस्पर्धी संघाकडून गोल केले. न्यूझीलंडचे खेळाडू सुरुवातीपासून आक्रमक होते. त्यांनी ‘डी’मध्ये प्रवेश करण्याचा वारंवार प्रयत्न केला; पण भारतीय बचावफळीने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरविले.

चौरंगी हॉकी मालिका : भारताची यजमान न्यूझीलंडवर मात
हॅमिल्टन : भारतीय पुरुष हॉकी संघाने बुधवारी चार देशांच्या हॉकी स्पर्धेत यजमान न्यूझीलंडला बुधवारी संघर्षपूर्ण लढतीत ३-२ ने नमविले. ललित उपाध्याय, हरजितसिंग आणि रुपिंदरपालसिंग यांनी गोल नोंदविले. डॅनियल हॅरिस आणि केन रसेल यांनी प्रतिस्पर्धी संघाकडून गोल केले. न्यूझीलंडचे खेळाडू सुरुवातीपासून आक्रमक होते. त्यांनी ‘डी’मध्ये प्रवेश करण्याचा वारंवार प्रयत्न केला; पण भारतीय बचावफळीने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरविले.
दौºयात पहिल्या टप्प्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. जपान आणि न्यूझीलंडला पराभवाचे धक्के दिले; मात्र बेल्जियमविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सातव्या मिनिटाला ललित उपाध्यायने चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसºया सत्राच्या सुरुवातीला न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याच्या दोन संधी मिळाल्या, मात्र भारतीय गोलरक्षक पी. आर .श्रीजेशने त्यांचे मनसुबे पुन्हा उधळून लावले.
अखेर २३व्या मिनिटाला न्यूझीलंडने पहिल्यांदा गोलचे खाते उघडले. डॅनियल हॅरिसने सुरेख
मैदानी गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. मध्यंतरानंतर ३१व्या मिनिटाला हरजितसिंगने पेनल्टी कॉर्नवर गोल करीत २-१ अशी आघाडी मिळवून दिली. ३६ व्या मिनिटाला रुपिंदरपालसिंग याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताच आघाडी ३-१ अशी झाली. ३७व्या मिनिटाला न्यूझीलंडकडून केन रसेलने पुन्हा एकदा मैदानी गोल केला. न्यूझीलंडने सामन्यात अनेकदा पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय बचावपटूंच्या भक्कम बचावापुढे त्यांना अपयश आले. अखेर सामना संपताना भारताने ३-२ या फरकाने सामन्यात बाजी मारली. भारताला दुसºया सामन्यात बेल्जियमविरुद्ध खेळावे लागेल. (वृत्तसंस्था)