शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

coronavirus: ‘आम्ही ऑलिम्पियन नव्हे, ऑलिम्पिक विजेत्या बनू इच्छितो’ -निक्की प्रधान  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 5:59 AM

२०१६ चा अनुभव सर्व खेळाडूंसाठी मोठा होता. ३६ वर्षानंतर पात्रता गाठता आली ही सुरुवात होती. टोकियो आॅलिम्पिकची पात्रतादेखील नोव्हेंबरमध्ये अमेरिकेवर मात करीत गाठली.

बेंगळुरू : टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताचा महिला हॉकी संघ पदक जिंकण्यासाठी कुठलीही कसर शिल्लक राखणार नाही, असा विश्वास मिडफिल्डर निक्की प्रधान हिने व्यक्त केला आहे. ‘आम्ही आॅलिम्पियन नव्हे, आॅलिम्पिक विजेत्या बनू इच्छितो’, असेही निक्कीने ठासून सांगितले. भारताच्या महिला हॉकी संघाने रिओ आॅलिम्पिकची(२०१६)३६ वर्षानंतर पात्रता गाठली होती.निक्की म्हणाली, ‘२०१६ चा अनुभव सर्व खेळाडूंसाठी मोठा होता. ३६ वर्षानंतर पात्रता गाठता आली ही सुरुवात होती. टोकियो आॅलिम्पिकची पात्रतादेखील नोव्हेंबरमध्ये अमेरिकेवर मात करीत गाठली. पाठोपाठ आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. मी नेहमी पदकाचे स्वप्न पाहिले. आॅलिम्पिक पदक विजेती खेळाडू अशी ओळख निर्माण करायची आहे. त्यादृष्टीनेच प्रयत्न करणार, यात शंका नाही.’झारखंडच्या हेसल या लहानशा गावातून सुरुवात केल्यानंतर आॅलिम्पिकपर्यंतचा प्रवास करणाऱ्या निक्कीने खुंटी जिल्ह्यात शिक्षण पूर्ण केले. मर्यादित साधने असतानादेखील निक्कीच्या परिसरातून भारतीय हॉकीला अनेक खेळाडू गवसले. कठोर मेहनत आणि निकटवर्तीयांच्या पाठिंब्यामुळे निक्की व्यावसायिक खेळाडू बनू शकली. राज्याचे प्रतिनिधित्व करीत चमक दाखविल्यामुळे लवकरच तिला राष्टÑीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. झारखंडमध्ये हॉकीला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे मत निक्कीने व्यक्त केले.भारताकडून ११० आंतरराष्टÑीय सामने खेळलेली ही खेळाडू पुढे म्हणाली, ‘मी आणि सलिमा टेटे एकाच जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो. आम्हा दोघींचा खेळ बघून झारखंडचे खेळाडू किती प्रतिभावान आहेत याची कल्पना करू शकता. गेल्या काही वर्षांत आम्हा दोघींचा खेळ चांगलाच बहरला. खेळाडू गंभीर असतील तर खेळाची प्रगती होणारच, हे भारतीय महिला हॉकी संघाकडे बघून म्हणता येईल. भविष्यात गाव खेड्यातील अनेक प्रतिभावान हॉकीपटू भारतीय संघाला मिळतील, असा मला विश्वास वाटतो.’ (वृत्तसंस्था)

 

टॅग्स :Hockeyहॉकी