CoronaVirus News : कोरोना लस आल्यानंतरच आंतरराष्ट्रीय हॉकी सुरू होणार - एफआयएच
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2020 07:17 IST2020-05-21T01:56:55+5:302020-05-21T07:17:14+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : स्पर्धेचे आयोजनदेखील याच प्रक्रियेद्वारे होऊ शकणार आहे. यासाठी मात्र कुठलीही कालमर्यादा ठरवण्यात आली नाही.

CoronaVirus News : कोरोना लस आल्यानंतरच आंतरराष्ट्रीय हॉकी सुरू होणार - एफआयएच
लुसाने : कोरोना व्हायरसवर लस आल्यानंतरच आंतरराष्ट्रीय हॉकी सुरू होईल, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने केली आहे.
विविध स्तरावर खेळ सुरू करण्यासाठी पाच टप्प्यात प्रक्रिया राबवली जाईल,असा खुलासादेखील यावेळी केला. सदस्य देशांमध्ये विश्व स्पर्धेचे आयोजनदेखील याच प्रक्रियेद्वारे होऊ शकणार आहे. यासाठी मात्र कुठलीही कालमर्यादा ठरवण्यात आली नाही.
खेळाच्या पुनरागमनाचा विचार अतिघाईचा ठरेल. एफआयएचने त्यासाठी पाच टप्प्यातील प्रक्रिया ठरवली आहे. याची सुरुवात
शारीरिक अंतराने होईल. नेदरलॅन्ड आणि बेल्जियम येथे अशा सरावास सुरुवात झाली.
पुढच्या टप्प्यात क्षेत्रिय स्पर्धांचे आयोजन होईल. त्यानंतर शेजारी देशांचा दौरा केला जाईल. पुढे विविध उपखंडात होणाऱ्या स्पर्धांचे आयोजन असेल. कोरोनावर लस आल्यास आधीसारखेच स्पर्धेचे आयोजन शक्य होणार असल्याचे एफआयएचने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
जागतिक आरोग्य संघटनेच्या दिशानिर्देशानुसार तयार करण्यात आलेल्या नियमांचे पालन खेळाडू, कोच, अधिकारी, स्टाफ, प्रशासन आणि स्वयंसेवक यांच्याकडून काटेकोरपणे होणार आहे.
याशिवाय जोखिमेचा
तक्ता तयार करण्यात आला असून त्याचे सक्तीने पालन करायचे आहे.
हॉकी सांघिक प्रकार असल्याने येथे अधिक जोखिम असते. त्यामुळे अनेक निर्बंध पाळावे लागतील,असे एफआयएचचे मत आहे.