मोठी बातमी : तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारे बलबीर सिंग सीनिअर ICUत; प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 20:18 IST2020-05-09T20:17:40+5:302020-05-09T20:18:29+5:30
हॉकीच्या सुवर्ण काळाचे साक्षीदार...

मोठी बातमी : तीन ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारे बलबीर सिंग सीनिअर ICUत; प्रकृती चिंताजनक
भारताचे दिग्गज हॉकीपटू आणि तीन ऑलिम्पिक सुवर्णपदकं नावावर असलेले बलबीर सिंग सीनिअर यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांना मोहाली येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी अचानक बलबीर सिंग यांची प्रकृती बिघडली आणि अजूनही ती चिंताजनक असल्याची माहिती त्यांचा नातू कबीर यानं दिली. बलबीर सिंग सीनिअर यांना ICUमध्ये दाखल करण्यात आले आहे.
95 वर्षीय बलबीर यांना गतवर्षी श्वासा संबंधीत त्रास झाला होता आणि चंदीगढच्या पीजीआईएमईआर मध्ये त्यांना अनेक आठवडे उपचार घ्यावे लागले होते. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्याच्या परिणाम शरीरातील विविध अवयवांवर दिसत होता, असे कुटुंबातील सदस्यानं सांगितले.
बलबीर यांनी लंडन ( 1948), हेलसिंकी ( 1952) आणि मेलबर्न ( 1956) ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी नेदरलँडविरुद्धच्या 6-1 अशा विजयात पाच गोल केले होते आणि हा विक्रम अजूनही कायम आहे. 1975च्या वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचे ते व्यवस्थापक होते.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनने काय केली MS Dhoni ची अवस्था; ओळखणंही झालं अवघड!
अनुष्कासोबत लग्न होण्यापूर्वी Virat Kohli होता ब्राझीलियन मॉडलचा प्रेमात!
कोरोना व्हायरसचा फटका; क्रिकेटपटूवर तंबूतच राहण्याची वेळ
Shocking : ...म्हणून पंजाब पोलिसानं झाडली गोळी, 24 वर्षीय आंतरराष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू
Mohammed Shamiच्या पत्नीनं ट्रोलर्सना सुनावलं; तीन व्हिडीओ शेअर करत घेतला समाचार