उमेदवाराला पाडा, ७१ लाख जिंका; शिंदेसेनेच्या संतोष बांगर यांनी दिले विरोधकांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 10:43 IST2026-01-09T10:43:21+5:302026-01-09T10:43:21+5:30
संतोष बांंगर यांनी शिंदेसेनेची उमेदवारी जाहीर करीत विरोधकांना आव्हान दिले.

उमेदवाराला पाडा, ७१ लाख जिंका; शिंदेसेनेच्या संतोष बांगर यांनी दिले विरोधकांना आव्हान
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पिंपळदरी गटातील आमचा उमेदवार पडला, तर ७१ लाखांचे बक्षीस घ्या आणि जिंकला तर ५१ लाख द्यावे लागतील, अशी पैज लावत आमदार संतोष बांगर यांनी विरोधकांना आव्हान दिले आणि जिल्हा परिषदेच्या पिंपळदरी गटातील शिंदेसेनेच्या उमेदवाराची घोषणाही केली.
औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे एकींशावली यात्रेतील कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन करताना कुस्तीच्या फडातच शड्डू ठोकत बांगर यांनी ही घोषणा केली. त्यांनी जिल्हा परिषद आगामी निवडणुकीच्या आखाड्यासाठी तयारीचे संकेत दिले. संजय भुरके यांची शिंदेसेनेची उमेदवारी जाहीर करीत विरोधकांना आव्हान दिले.