युवक वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:56 IST2019-01-12T00:55:40+5:302019-01-12T00:56:03+5:30

नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील चांभरा तांडा येथे कंदोरी कार्यक्रमासाठी गिरगाव येथील युवक शेख रहीमोद्दीन (१५) हा गेला असता अचानक कालव्यात पडल्याने इसापूर धरणाच्या कालव्यात वाहून गेला आहे.

 Youths were carried away | युवक वाहून गेला

युवक वाहून गेला

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदा : नांदेड जिल्ह्यातील हादगाव तालुक्यातील चांभरा तांडा येथे कंदोरी कार्यक्रमासाठी गिरगाव येथील युवक शेख रहीमोद्दीन (१५) हा गेला असता अचानक कालव्यात पडल्याने इसापूर धरणाच्या कालव्यात वाहून गेला आहे. घटनेस दोन दिवस उलटले तरी त्या युवकाचा शोध लागला नाही.
गिरगाव येथील शेख रहीमोद्दीन शेख सलाउद्दीन हा युवक कंदोरीसाठी नागरिकांसोबत हादगाव तालुक्यातील चांभरा तांडा येथे १० जानेवारी रोजी गेला होता. चांभरा तांडा येथून इसापूर धरणाचा कालवा गेलेला आहे. या कालव्यात अचानक या युवकाचा पाय घसरल्याने १० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजन्याच्या सुमारास वाहून गेला. पाण्याचा प्रवाह सुरु असल्याने अद्याप त्याचा शोध लागला नाही. प्रशासनाकडून तातडीने मदत न मिळाल्याने गिरगाव येथील ग्रामस्थ मदतीला धावले आहेत.

Web Title:  Youths were carried away