वसमत येथे टोळीयुद्धातून तरुणाची हत्या; एकजण गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 10:52 IST2019-07-01T10:50:39+5:302019-07-01T10:52:56+5:30

मृत व जखमीवर अनेक गुन्हे दाखल आहेत

Youth killed in gang war in Vasmat; One seriously injured | वसमत येथे टोळीयुद्धातून तरुणाची हत्या; एकजण गंभीर जखमी

वसमत येथे टोळीयुद्धातून तरुणाची हत्या; एकजण गंभीर जखमी

वसमत (हिंगोली ) : येथील बुधवार पेठ भागातील शिवा सवदा (30) याची रविवारी रात्री धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. हल्ल्यात त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. आपसातील वाद आणि टोळी युद्धातून ही हत्या झाल्याची चर्चा आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वसमत नांदेड रोडवरील माळव टा पाटीवर हॉटेल मध्ये रविवारी रात्री उशिरा हाणामारी झाली यात ऐका टोळक्याने धारदार शस्त्राने शिवा आणि त्याचा साथीदार श्रीकांत बाबुराव सांडे (१९ ) यांच्यावर वार केले यात दोघेही गंभीर जखमी झाले. जखमींना नांदेडला हलवण्यात आले. तेथे शिवा यास तपासून मृत घोषित करण्यात आले. 

मृत शिवा आणि जखमी श्रीकांत यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. यामुळे जुन्या भांडणाचा बदला म्हणून ही हत्या झाली असल्याचा संशय आहे. या घटनेने वसमत मध्ये खळबळ उडाली आहे

या प्रकरणी श्रीकांत  सांडे याच्या तक्रारीवरून प्रभाकर क्षीरसागर, रामा क्षीरसागर, भरत क्षीरसागर, सोनू क्षीरसागर, अमोल क्षीरसागर, भागवत जाधव (सर्व  रा. वसमत) यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: Youth killed in gang war in Vasmat; One seriously injured