मोटार दुरुस्तीसाठी गेलेल्या तरुणाचा कयाधू नदीपात्रात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 14:46 IST2018-11-16T14:46:12+5:302018-11-16T14:46:40+5:30
पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी (26 ) असे मृत तरुणाचे नाव असून तो शेवाळा येथीलच रहिवासी होता.

मोटार दुरुस्तीसाठी गेलेल्या तरुणाचा कयाधू नदीपात्रात बुडून मृत्यू
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : शेवाळा गावालगत असलेल्या कयाधू नदीच्या पात्रात बसवलेल्या मोटारची दुरुस्ती करताना पाण्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता घडली. पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी (26 ) असे मृत तरुणाचे नाव असून तो शेवाळा येथीलच रहिवासी होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी १० वाजेच्या सुमारास पांडुरंग दिगंबर सूर्यवंशी हा कयाधू नदी पात्राजवळ मोटार दुरुस्तीचे काम करत होता. यावेळी मोटारच्या पाईपला असलेल्या फुटबॉलचा कचरा काढत असताना दिगंबर हा पाय घसरून पाण्यात पडला. दिगंबरला पोहता येत नसल्याने तो पात्रात बुडाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला.
पात्रा नजीकच्या काही व्यक्तींना हे लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती पोलीस स्थानकाला दिली. तब्बल दीड तासानंतर दिगंबरचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणला असून त्याचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिली आहे.