नांदेडकडे जाणारा मार्ग कोणता? विचारत मॉर्निग वॉक करणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी पळवली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 02:52 PM2023-06-19T14:52:11+5:302023-06-19T14:52:41+5:30

वृद्धेने आरडाओरड केला, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.

Which is the route to Nanded? The gold chain of the old woman who was taking a morning walk was run away asking | नांदेडकडे जाणारा मार्ग कोणता? विचारत मॉर्निग वॉक करणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी पळवली

नांदेडकडे जाणारा मार्ग कोणता? विचारत मॉर्निग वॉक करणाऱ्या वृद्धेची सोनसाखळी पळवली

googlenewsNext

- इस्माईल जाहगिरदार
वसमत (हिंगोली):
मॉर्निंग वॉक करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धेस नांदेडकडे जाणारा मार्ग कोणता? असे विचारत दुचाकीस्वाराने चाकूचा धाक दाखवत ३ तोळ्याची सोनसाखळी पळविल्याची घटना आज पहाटे शहरातील बँक कॉलनी भागात घडली. चोरट्यांनी दुचाकीवरून कौठा रोडच्या दिशेने पळ काढला.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, बँक कॉलनीत अलका रमेश निलावार (६५) या मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडल्या. दरम्यान, कौठा रोडवर दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी नांदेडकडे जाणारा मार्ग कोणता? अशी विचारणा त्यांना केली. निलावार थांबताच दुचाकीस्वारांनी चाकूचा धाक दाखवत त्यांच्या गळ्यातील ३ तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. 

निलावार यांनी आरडाओरड केला. मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. माहिती मिळताच शहर पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने घटनास्थळी येऊन पाहणी केली. पोनि चंद्रशेखर कदम, एलसीबीचे सपोनि सुनिल गोपीनवार, अक्षय टारफे, गजानन भोपे, शेख हकीम आदी कर्मचारी पुढील. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Which is the route to Nanded? The gold chain of the old woman who was taking a morning walk was run away asking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.