शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

टंचाईचे सावट! नांदेड-परभणी-हिंगोली जिल्ह्यांत आठवड्यात ६६.६० दलघमीने पाण्याचे बाष्पीभवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 14:29 IST

मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा घटला;  बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने प्रकल्पांतील पाणी झाले कमी

हिंगोली : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने सिंचन प्रकल्पांमधील पाण्याचेही मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असून, पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांत एका आठवड्यात ६६.६० दलघमीने पाणीसाठा कमी झाला आहे. सध्या जिल्ह्यांतील तिन्ही प्रकल्पांत केवळ ५० टक्केच पाणीसाठा शिल्लक असून, पाणीटंचाई घोंगावत आहे.

पावसाळ्यात सिंचन प्रकल्पांत झालेला पाणीसाठा उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी वापरला जातो. मात्र, या काळात तापमानात मोठी वाढ होत असल्याने प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने होते. परिणामी पाणीसाठा कमी होत जातो.

नांदेड जिल्ह्यात छोटे आणि मोठे असे एकूण १०४ प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची उपयुक्त पाणी साठवण क्षमता ७२८ दलघमी एवढी असून, या प्रकल्पांत सध्या २७१.५८ दलघमी (३७.३० टक्के) पाणी शिल्लक आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये २८३ दलघमी पाणी शिल्लक होते. आठ दिवसांत १२ दलघमी पाणी कमी झाले आहे. परभणी जिल्ह्यातील पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात ९ प्रकल्प असून, त्यात मागील आठवड्यात ५५४.१७ दलघमी पाणीसाठा होता. आता तो ५०३.८६ दलघमी शिल्लक राहिला आहे. जिल्ह्यातील प्रकल्पांत ८ दिवसांत सर्वाधिक ५१ दलघमी पाणी कमी झाले आहे.

हिंगोली जिल्ह्यात मात्र उलट स्थिती आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात ३७.७४ दलघमी पाणीसाठा होता. या आठवड्यात तो ६०.५७ दलघमी एवढा झाला आहे. येलदरी प्रकल्पातील पाणी हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर प्रकल्पात सोडले जाते. त्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर धरणातही पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे. या धरणात मागील आठवड्यात ५७९.६३ दलघमी पाणीसाठा होता. या आठवड्यात हा साठा ५५२.९१ दलघमी एवढा झाला आहे. या प्रकल्पातील २७ दलघमी पाणी एका आठवड्यात कमी झाले. तिन्ही जिल्ह्यांतील या प्रकल्पांमध्ये २७५०.३५ दलघमी उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता आहे. सध्या प्रकल्पांमध्ये केवळ १३८८.९२ दलघमी म्हणजे ५०.५० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

मोठ्या प्रकल्पांतील घटलेला पाणीसाठा (दलघमीमध्ये)प्रकल्प मागील आठवड्यात या आठवड्यातमानार ७०.८६ ६९.०९विष्णुपुरी ३४.६३ ३४.४८इसापूर ५७९            ५५२येलदरी ५२०.९८ ४७२.५८

३४ तलावांत ज्योत्याखाली पाणीतिन्ही जिल्ह्यांतील एकूण प्रकल्पांपैकी ३४ प्रकल्प ज्योत्याखाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील २३ प्रकल्पांमधील पाणीसाठा ज्योत्याखाली आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील ११ प्रकल्पांत ज्योत्याखाली पाणीसाठा आहे. ४४ प्रकल्पांमध्ये २५ टक्के पाणीसाठा आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ३८, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी ३ प्रकल्पांचा समावेश आहे.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीHingoliहिंगोलीNandedनांदेडwater shortageपाणीकपात